Headlines

दर्जेदार ऊसाचा वाण दिल्यास गा‌ळपात शेतकऱ्यांना लाभ:चेअरमन शिवाजीराव सावंत यांनी दिली माहिती‎




राजवी ॲग्रो पॉवर प्रा.लि. आलेगाव बु. (ता. माढा) येथे गळीत हंगाम २०२६-२७ च्या शुभारंभानिमित्त रोलर पूजन सोहळा संपन्न झाला. कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्या शुभहस्ते रोलरचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत होते. यावेळी बोलताना अध्यक्ष शिवाजीराव सावंत म्हणाले, “शेतकऱ्यांनी दर्जेदार ऊस दिल्यास कारखान्याला चांगले गाळप करता येते आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांनाच होतो. त्यामुळे सर्वांनी वेळेत तोडणी-वाहतूक करून दर्जेदार ऊस द्यावा. आपल्या एकजुटीतूनच हा हंगाम यशस्वी होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कालिदास सावंत, ऋतुराज सावंत, सूर्यकांत शेंडगे, तानाजी गाडे, भजनदास खटके, जब्बार महाजन यांच्यासह शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सूत्रसंचालन व आभार राजाभाऊ खटके यांनी मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *