Headlines

दिव्य मराठी एक्सपाेज:17 तलावांचा गाळ कागदोपत्री काढून 5.32 कोटी रुपये हडपले, धाराशिवला गाळमुक्त धरण योजनेत घोटाळा




धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील 17 पाझर तलावांतून गाळ उपसा न करताच बोगस कागदपत्रे तयार करुन गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून 5 कोटी 31 लाख 75 हजार रुपये हडपले. माहिती अधिकारात हे समोर आले आहे. त्याचे पुरावे ‘दिव्य मराठी’कडे आहेत. ज्या पाझर तलावातून गाळ उपसा केल्याचे दाखवले आहे, त्या तलावात काटेरी झुडपे वाढली आहेत. बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील जय गुरु गणेश मंडळ या संस्थेला गाळ उपशाचे काम देण्यात आले होते. ही संस्था मुळात शेतीमाल खरेदी करणारी संस्था म्हणून नोंदणीकृत आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या व गाळ उपशाच्या तांत्रिक कामांशी या संस्थेचा संबंध नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर सुरुवातीला पैसे जमा करण्यात आले आणि नंतर ते शेतीमाल खरेदीच्या नावाखाली पुन्हा काढून घेतले. वाशी तालुक्यातील गिरवली येथील काम पूर्ण झाल्याचे भूम तालुक्यातील तलाठ्याने स्वाक्षरी करून प्रमाणपत्र दिल्याचेही समोर आले आहे. योजनेसाठी आवश्यक असणारी अनेक शेतकऱ्यांची संमतीपत्रे बनावट तयार करण्यात आली आहेत. या शेतकऱ्यांनी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर गाळ उपसा न करताच शेतात गाळ टाकल्याचे म्हटले आहे. एका गावातील तलावासाठी दुसऱ्याच गावच्या ग्रामपंचायतीचा ठराव जोडण्यात आल्याचे उघड झाले आहे. सन 2024-25 या कालावधीत ही कामे पूर्ण झाल्याचे दाखविणारे बोगस रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे. या घोटाळ्याशी माझा काही संबध नाही 2 गटांच्या भांडणातून तक्रारी करण्यात आल्या आहेत. पाझर तलाव एका गावचा असताना दुसऱ्या गावच्या ग्रामपंचायतीचा कसा याबाबत अपवादाने तसे झाले असेल. त्याच्याशी माझा कोणताही संबध नाही. प्रभाकर महामुनी, जलसंपदा अधिकारी, धाराशिव

हे आहेत जबाबदार या योजनेत कागदपत्रांची फेरफार करण्यात आली आहे. त्यात जलसंपदाचे जलसंधारण अधिकारी, उपअभियंता आणि संबंधित तलाठी, महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमताने घोटाळ्याचा संशय आहे. असा केला घोटाळा परंडा तालुक्यातील डुक्करवाडीचा पाझर तलाव तुळजापूर तालुक्यात दाखवला. वाशीतील कामासाठी भूम तालुक्यातील तलाठ्याचे प्रमाणपत्र दिले. शेतकऱ्यांची बनावट संमतीपत्रे तयार करून सादर केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *