Headlines

'दिशा सालियान प्रकरणात तपास यंत्रणा सत्य बाहेर आणतील':छगन भुजबळांची पहिलीच प्रतिक्रिया; कुंभमेळ्यावरही दिली प्रतिक्रिया




दिशा सालियान प्रकरणावरून राज्यातील अनेक नेते प्रतिक्रिया देत असून, तिचे वडील सतीश सालियान यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव घेत त्यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत. सध्या सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून काहींनी थेट आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. या सर्व घडामोडींवर भाष्य करताना मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून चौकशी करणाऱ्या संस्था त्यातील सत्य नक्कीच बाहेर आणतील. छगन भुजबळ यांना दिशा सालियान प्रकरणावर प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले की, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून चौकशी करणाऱ्या संस्था आणि त्यातील सत्य नक्कीच बाहेर आणतील, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, दिशाचे वडील सतीश सालियान हे त्यांच्या वकिलांसह ठाकरेंच्या मातोश्रीवर गेले होते. यावेळी त्यांच्या वकिलांनी ठाकरेंच्या वकिलांना नोटीस दिली. यात आदित्य ठाकरे यांच्यावर 500 कोटींच्या अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यात आला आहे. पुढे कुंभमेळाव्याच्या बैठकीवर बोलताना छगन भुजबळांनी म्हटले की, त्यांच्या बैठकीला मला जाता आले नाही. अधिकारी येऊन मला सांगणार आहेत. त्यांनी जबाबदारी घेतली आहे, ते जबाबदारी पार पाडणार आहेत. सर्व काम वेळेत आणि चांगली होणार आहेत. जे ठरले आहे तसे झाले पाहिजे. छगन भुजबळ म्हणाले, पर्यटक मोठी अर्थव्यवस्था आहे. एसपीनीही हे लक्षात घेतले पाहिजे, स्थानिक पोलीसांनी काळजी घेतली पाहिजे, पेट्रोलिंग झाले पाहिजे, पोलिसांनी जागरुक राहिले पाहिजे. गंगापुर रोडवरील झाडांच्या मुद्द्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, मी पालिका आयुक्तांसोबत बोललो. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. संबंधित कंपनीला ब्लॅकलीस्ट केले आहे. नागरिकांनीच आता रस्त्यावर आले पाहिजे. आता आपल्यालाच काम करावे लागेल, हे लोक असतात, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे. कुंभमेळासाठी लागणाऱ्या जागेविषयी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, जर 38 हजार कोटी खर्च करणार आहेत. मागचे पैसे देणे आहे ते दिलेच पाहिजे. कोणावर अन्याय करता कामा नये. ही तयारी करतांना नाशिककरांच्या जिवावर उठणार नाही. नांदेडमधील दुष्काळाच्या मुद्द्यावर आयोजित बैठकीतील काजु बदामच्या मुद्द्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटले की, कॅबिनेटमध्ये चर्चा झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *