Headlines

देवस्थान इनाम समितीवर अमरावतीचे अनुप जयस्वाल यांची निवड:राज्यातील जमिनींबाबत अधिनियम तयार करण्यासाठी 13 सदस्यीय समिती स्थापन




राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत अधिनियम तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या १३ सदस्यीय समितीवर अमरावतीचे अनुप जयस्वाल यांची निवड झाली आहे. महसूल खात्याने ही घोषणा केली. या समितीत विदर्भातून नागपूरचे अनिल सांबरे यांचाही समावेश आहे. अनुप जयस्वाल हे मूळचे रिद्धपूर (ता. मोर्शी) येथील रहिवासी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते देवस्थानच्या बळकावलेल्या जमिनी मुक्त करून त्या संबंधित संस्थांच्या ताब्यात देण्याचे कार्य करत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी देवस्थानच्या जमिनी मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रिद्धपूर येथून सुरू झालेल्या त्यांच्या कार्याची व्याप्ती आता राज्यभर पसरली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. जयस्वाल यांच्या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे माजी सभापती तात्यासाहेब मेश्राम, मनोज वानखडे, गोपाल सेवतकर, हरिदास नानवटकर, मोहनराव ढोमणे यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *