Headlines

देवेंद्र फडणवीसांच्या काकांचा विश्वास;माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल:‘देवाभाऊ’ पुस्तक प्रकाशित, चंद्रकांत पाटलांकडूनही मुख्यमंत्र्यांचे कौतुक



माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असा ठाम विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला. पुण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत बोलावून केंद्रीय मनुष्य

.

तरीही, राऊत यांचे सातत्यपूर्ण दावे आणि आता थेट ‘पुतण्या पंतप्रधान होईल’ हा काकांनी व्यक्त केलेला विश्वास पाहता, या चर्चांना नव्याने हवा मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतरही या सर्व घडामोडींमुळे त्यांच्या दिल्लीतील वर्णीच्या सर्व तर्कांना पुन्हा हवा मिळाली आहे.

फडणवीसांकडे दैवी शक्ती, ते सर्वगुणसंपन्न- चंद्रकांत पाटील

याच कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, फडणवीस यांना दैवी शक्ती प्राप्त असून ते सर्वगुणसंपन्न नेते आहेत. मी असे अनेक मुख्यमंत्री पाहिले, जे निवेदनांवर केवळ खुणा करायचे, पण फडणवीस हे ६० कोटींच्या निधीच्या प्रस्तावावर जागेवरच सही करतात. सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कर्जमाफीची पत्रकार परिषद पहाटे ४ वाजता घेतली होती. त्यांच्या अभ्यासामुळेच मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

फडणवीस यांच्या जीवनावर आधारित ‘देवाभाऊ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. फडणवीस यांच्या दिल्लीत केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याच्या चर्चांना काकांच्या या वक्तव्याने पुन्हा हवा मिळाली आहे.

प्रकाशन सोहळ्यात बोलताना काका बाळासाहेब यांनी मुख्यमंत्र्यांच्या बालपणापासून ते राजकारणातील यशापर्यंतच्या प्रवासावर मोकळेपणाने भाष्य केले. लहानपणी अतिशय धीरगंभीर वाटणारा देवेंद्र घरात कुटुंबासोबत अतिशय मोकळेपणाने वागतो आणि खोड्याही करतो. वयाच्या २१व्या वर्षी तो नगरसेवक आणि २७व्या वर्षी महापौर झाला. त्याच्या जन्मपत्रिकेत चंद्रबळ कमी असले तरी तो घराण्याचे नाव रोशन करेल, असे भाकीत माझ्या वडिलांनी वर्तवले होते. लॉ कॉलेजमध्ये मध्ये सुवर्णपदक मिळवल्याने देवेंद्र मोठा कायदेतज्ज्ञ होईल असे वाटले होते, पण जीवनात कलाटणी मिळाली आणि लहान वयात तो राज्याचा मुख्यमंत्री झाला, असेही ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *