Headlines

देशभरात 15 लाख लोकांना 2,000 कोटींचा गंडा:संभाजीनगरात 1 अटकेत, ‘एसडी पे’ ॲपद्वारे गुंतवणूक घोटाळा, गुजरात पोलिसांची शहरात कारवाई



‘एसडी पे’ ॲपद्वारे गुंतवणुकीवर रोज ०.१५ टक्के ते ०.३० टक्के परताव्याचे आमिष दाखवून देशभरात १५ लाखांहून अधिक लोकांची फसवणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटमधील एकाला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली. गुजरातच्या वडोदरा सायबर क्राइम व पुंडलिकनगर पोलिसांनी गजानन नगर

.

हा घोटाळा २,००० कोटी रुपयांहून जास्त असल्याचा संशय आहे. नारायणच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा झाल्याचे तसेच त्याने ५ ते १० टक्के कमिशनसाठी खाते भाड्याने दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्य सूत्रधारांसह नऊपेक्षा जास्त जणांना अटक

मुख्य सूत्रधार धवल पटेल, हिरेन शहा, भावेश धनेचा, आशिष गेडिया व भावेश चौहान यांच्यासह नऊपेक्षा जास्त आरोपींना अटक केली आहे. २०२४ पासून सुरू असलेल्या ‘एसडी पे’ ने मार्च २०२६ मध्ये परतावा देणे बंद केले. ॲपचे नाव ‘अपना पे’ असे ठेवल्याने प्रकार उघड झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *