![]()
कांद्याचे वाढते भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून केलेल्या कांदा खरेदीत तब्बल ८८ कोटींचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने १० ते ३० जुलै या काळात नाशिकमधून २७० कोटींचा कांदा खरेदी केला. तत्कालीन बाजारभाव १५०० रुपये क्विंटल असताना सरकारने मात्र २३०० रुपये क्विंटल दराने खरेदी केली. १ लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी वादात
संस्था : नाफेड
फार्मर कंपनी : २२
खरेदी कांदा : ५६ हजार ७८५ मेट्रिक टन
बाजारभावात फरक : ८०० रुपये मेट्रिक टन
घोटाळा : ४१ कोटी ६० लाख आकाराची अट शिथिल केल्याने खरेदी केला गोल्टी कांदा कांद्याच्या आकाराची अट शिथिल करण्यात आल्याने आम्ही गोल्टी कांदा खरेदी केला. आमच्याकडे केवळ अडीच हजार मेट्रिक टन कांदा ‘ए-वन’ दर्जाचा आहे, उर्वरित गोल्टी आहे. आम्हाला २ लाख मेट्रिक टन खरेदीचे उद्दिष्ट होते. -अंकित मदान, व्यवस्थापक, नाफेड, नाशिक शाखा खरेदी केलेला कांदा
संस्था : एनसीसीएफ
फार्मर कंपनी / सोसायटी : ४३
कांदा खरेदी : ६२ हजार ६२५ मेट्रिक टन
बाजारभावात फरक : ८०० रुपये मेट्रिक टन
घोटाळा : ४५ कोटी ६० लाख
Source link
नाफेड, एनसीसीएफचा कांदा खरेदीत 88 कोटी रुपयांचा ‘घोळ’:वाढीव भावात खरेदी, 1 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी वादात