Headlines

ढोल-ताशांच्या गजरात विंचूरला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक:शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञानासह देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण‎


.

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.

प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग सल्लागार समितीचे सदस्य सुनील मालपणी व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. मुख्य सदस्य डॉ. सुजित गुंजाळ व उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मिरवणुकीसाठी सज्ज असलेल्या रथातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. विद्यालयातील एकूण ४० वर्गांना विविध विषयांवर आधारित कार्यक्रम सादर करण्याची संधी देण्यात आली होती. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, अंधश्रद्धा निर्मूलन, समाज परिवर्तन, धार्मिक-अध्यात्मिक विचार, देशभक्तीपर गीत अशा विविध विषयांनी सजलेल्या कार्यक्रमांचे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सादरीकरण केले.

ढोल-ताशा आणि लेझीमच्या गजरात तसेच ‘कर्मवीर भाऊराव पाटील’, ‘लक्ष्मीबाई भाऊराव पाटील’ आणि ‘रयत शिक्षण संस्था’ यांच्या जयघोषात विंचूर गावातून सजविलेल्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. सूत्रसंचालन राजेंद्र चांदे यांनी केले.

यावेळी मान्यवर, नागरिक व प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका नीलिमा शिरसाठ, प्राचार्य नंदकुमार देवढे, उप मुख्याध्यापक सुरेश वाबळे, विद्यालयाचे पर्यवेक्षक जयवंत ठाकरे, पर्यवेक्षक सुदाम माळी व विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक, विंचूर व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी | सटाणा प्रतिकूल आर्थिक व सामाजिक परिस्थितीत बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे महान कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. संस्थेसाठी त्यांनी केलेला त्याग आणि कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्रा. नानासाहेब निकम यांनी केले. केरसाने येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पंकज ठाकरे होते. यावेळी पोलिस पाटील कांतिलाल सोनवणे, पंडित मोरे, दिलीप मोरे, धनसिंग आहिरे व मुख्याध्यापक दिलीप गावित उपस्थित होते. पंकज ठाकरे यांनी शिक्षण हे मोठे शस्त्र असून, त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सर्वांगीण विकासासोबतच गावाच्या प्रगतीसाठी करावा, असे सांगितले. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप गावित, सूत्रसंचालन एम. आर. भुजाडे यांनी केले, तर एन. एम. गावित यांनी आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *