Headlines

सटाणा ग्रामीणमध्ये खंडित वीजपुरवठा; महावितरण कार्यालयात 1 तास ठिय्या:राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, रिकाम्या खुर्चीला पुष्पहार अर्पण‎




गणेशोत्सवाच्या काळात बागलाण ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने महावितरण कार्यालयात १ तास ठिय्या आंदोलन केले. माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सहाय्यक कार्यकारी अभियंता के. डी. बोरसे यांना घेराव घालण्यात आला. कार्यकारी अभियंता आर. के. शिरसाठ यांच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून आंदोलकांनी निषेध केला. ग्रामीण भागात पावसाची ओढ असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी विजेवर अवलंबून आहेत. मात्र, ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्यानंतर तो पूर्ववत होण्यास विलंब होत असल्याने शेतीचे नियोजन कोलमडत आहे. यामुळे ग्रामीण भागातील वीजवाहिन्या, ट्रान्सफार्मर आणि उपकेंद्रांची तातडीने तपासणी करून देखभाल करावी, जळालेले ट्रान्सफार्मर वेळेत बदलावे व सणांच्या पार्श्वभूमीवर तक्रार निवारण यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनात तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, भारत काटके, मनोज सोनवणे, साहेबराव सोनवणे, पोपट सोनवणे, हिरामण गांगुर्डे, सुभाष झाल्टे आदी सहभागी झाले होते. बागलाण तालुक्यात ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याचा प्रश्न केवळ भारनियमनापुरता मर्यादित नसून, ट्रान्सफार्मर जळल्यानंतर तो वेळेत दुरुस्त किंवा बदलला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. तक्रार करूनही ‘मटेरियल उपलब्ध नाही’ असे सांगितले जाते आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी केबल, फ्यूज व अन्य साहित्याची व्यवस्था शेतकऱ्यांनाच स्वतःच्या खर्चातून करावी लागते. ग्रामीण भागातील बहुतांश शिवारात जेथे सिंगल फेज योजना आहे तेथे सायंकाळी पाच वाजता थ्री फेज वीज पुरवठा खंडित होतो व सिंगल फेज वीज पुरवठा सुरू केला जातो ही विज अतिशय कमी दाबाने असते तेथे फक्त एल इ डी बल्प लागतात. सायंकाळी पाच वाजता खंडित झालेली थ्री फेज वीज दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रात्री बिबट्या साप व जंगली श्वापदांचा धोका निर्माण होत असतो. ^किकवारी येथील शेतकरी भिला काकुळते यांच्या म्हशीने दि.१८ रोजी पारडाला जन्म दिला. मात्र रात्रीच्या कमी प्रकाशामुळे शेतकरी काकुळते यांची नजर चुकवून बिबट्याने पिल्लाला उचलून नेले. किकवारी खुर्द, किकवारी बुद्रुक, तळवाडे, दिगर,पठावा, मोरकुरे आदींसह बहुसंख्य गावातील शिवारात सिंगल फेज योजना फेल झाली आहे. – गणेश काकुळते, शेतकरी किकवारी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *