Headlines

Breaking into closed towers, fraud by showing foreign calls +91, crimes of digital arrest from ghost towers


  • Marathi News
  • National
  • Breaking Into Closed Towers, Fraud By Showing Foreign Calls +91, Crimes Of Digital Arrest From Ghost Towers

अजय प्रकाश | नवी दिल्ली29 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

कंबोडिया, म्यानमार, दुबईसारख्या देशांतून सायबर भामट्यांचे कॉल तुमच्या मोबाइलवर भारतीय क्रमांकावरून (+९१) कसे दिसतात? याच्या तपासात टेलिकॉम नेटवर्कच्या गैरवापराची नवीन पद्धत समोर आली. सायबर गुन्हेगार ग्रामीण व दुर्गम भागातील बंद किंवा निष्क्रीय पडून राहिलेल्या टेलिकॉम टॉवर्सची (घोस्ट टॉवर्स) निवड करतात. त्यांच्या आसपास बेकायदा जीएसएम गेटवे किंवा सिम बॉक्स लावून ते परदेशी इंटरनेट कॉल भारतीय कॉलमध्ये बदलतात. नंतर याच क्रमांकांवरून ‘डिजिटल अरेस्ट’, बनावट गुंतवणूक, सायबर फसवणूक केली जाते.

दूरसंचार मंत्रालयाच्या इनपुटनंतर सीबीआयने एका महिन्यात नोएडा, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, बंगळुरू तसेच बिहारमधील सुपौल आणि महुआ (वैशाली), ओडिशातील जगतसिंगपूर येथे छापे टाकले. एका वितरकालाही पकडण्यात आले आहे. त्याने ग्रामस्थांची ई-केवायसी करून १,३०० पेक्षा जास्त सिम चालू केल्याचा आरोप आहे. याचा वापर बेकायदेशीर सिम बॉक्समध्ये करून सायबर फसवणुकीसाठी कॉल केले.

मोठा खेळ… बेकायदा सिम बॉक्सद्वारे कन्व्हर्ट

सायबर भामटे निष्क्रिय किंवा निर्जन टॉवरजवळ वीज आणि टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून बेकायदा सिम बॉक्स जोडतात. परदेशातील इंटरनेट कॉल सामान्य आंतरराष्ट्रीय गेटवेऐवजी या सिम बॉक्सपर्यंत पोहोचतो. यातून जाताच तो भारतीय क्रमांकात (+९१) बदलतो. सायबर सुरक्षा तज्ज्ञ अमित दुबे सांगतात, देखरेख नसलेले टॉवर ‘ब्लाइंड स्पॉट’ बनू शकतात. यांची देखरेख वाढल्याने बेकायदेशीर सिम बॉक्स नेटवर्क पकडण्यास मदत होऊ शकते.

निष्क्रिय टॉवर्सची जिओ-टॅगिंग सुरू

या प्रकारानंतर दूरसंचार विभागाने देखरेख वाढवलीे. सुरक्षा विंगचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, बंद , निष्क्रिय टॉवर्सची डिजिटल मॅपिंग व जिओ-टॅगिंग सुरू केले. टॉवर कंपन्या,ऑपरेटरचा निष्काळजीपणा आढळल्यास ५० लाख ते ५ कोटी रुपयांपर्यंत दंड, कारवाई होऊ शकते.

काय करावे: कोणत्याही बंद टॉवरजवळ संशयास्पद हालचाल दिसल्यास किंवा मोबाईल नेटवर्क अचानक ४जी/५जी वरून २जी वर आल्यास याची माहिती संचार साथी पोर्टल,राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० वर द्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *