Headlines

कर्जाच्या विवंचनेमधून औराळा येथील शेतकऱ्याची आत्महत्या:राहत्या घरी विष प्राशन करून संपवली जीवनयात्रा‎




कन्नड तालुक्यातील धनगरवाडी-औराळा येथील शेतकरी रामकृष्ण शंकर वाघचौरे (३९) यांनी मंगळवारी रात्री कर्जाच्या विवंचनेतून राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मावळली. रामकृष्ण वाघचौरे यांची औराळा शिवारात आठ एकर शेती आहे. त्यांनी मका, कपाशी आणि तुरीची लागवड केली होती. मात्र, ५० दिवस पावसाने ताण दिल्याने उभी पिके करपून गेली. शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या चिंतेत ते होते. कन्नड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार, डॉ. मनिषा मोतिंगे यांनी उपचार सुरू केले; मात्र रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. देवगाव रंगारी ठाण्यात या घटनेची नोंद असून, वाघचौरे यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. पावणेदोन लाखांचे कर्ज तहसीलदार सारिका भगत यांच्या निर्देशानुसार तलाठ्यांनी पंचनामा केला असून, त्यांच्यावर सोसायटीचे १ लाख ७५ हजार रुपये कर्ज असल्याचे समोर आले आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *