Headlines

देशमुख यांच्या जाण्याने नगरचा चालता-बोलता इतिहास हरपला:उद्योजक राजगुरू यांनी जागवल्या ज्येष्ठ पत्रकार देशमुख यांच्या आठवणी‎




अहिल्यानगर शहरावर जीवापाड प्रेम करणारे ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक आणि नगरच्या इतिहासाचे गाढे जाणकार भूषण देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने नगरच्या सांस्कृतिक, पत्रकारिता आणि बौद्धिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली आहे. संपूर्ण आयुष्य त्यांनी नगरचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी समर्पित केले होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना उद्योजक शैलेश राजगुरू यांनी एका प्रसंगाचा विशेष उल्लेख केला. या वर्षीच्या पाडवा महोत्सवात ‘रसिक ग्रुप’च्या वतीने भूषण देशमुख यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले होते. १९ मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमात त्यांची आसनव्यवस्था शैलेश राजगुरू यांच्या शेजारीच होती, ज्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्या गप्पांदरम्यान राजगुरू यांनी तत्कालीन चर्चेत असलेल्या माळीवाडा वेस पाडण्याच्या प्रस्तावावर आणि ‘अहमदनगर’चे नामकरण ‘अहिल्यानगर’ करण्याबाबत इतिहास अभ्यासक म्हणून त्यांचे मत विचारले होते. त्यावर देशमुख यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यांनी सांगितले होते, माळीवाडा वेस असो वा नामकरण, नगर शहराचा समृद्ध इतिहास पुसला जाता कामा नये. सन १४९४ मध्ये मलिक अहमद निजामशहाने इराण, कैरो आणि बगदादच्या धर्तीवर स्वतंत्र नवी राजधानी म्हणून या शहराची स्थापना केली होती. त्यामुळे शहराचे नाव अहमदनगर असणे स्वाभाविक होते. अहिल्यानगरबाबत बोलताना ते म्हणाले होते, “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जन्मभूमी नगर जिल्ह्यातील चौंडी असली, तरी त्यांची कर्मभूमी इंदूर व महेश्वर (मध्य प्रदेश) हीच होती. आम्ही प्रशासनाला विनंती केली होती की, सन्मान करायचाच असेल तर जिल्ह्याचे नाव अहिल्याबाईंच्या नावे करा, पण शहराचे नाव अहमदनगरच ठेवावे. शहराची न भरून निघणारी हानी : आ. जगताप ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यां च्या पार्थिवावर सायंकाळी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकसंवेदना व्यक्त करताना आमदार संग्राम जगताप यांनी देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांची जागा आता कोणी घेऊ शकणार नाही. देशमुख यांच्या निधनाने शहराची न भरून निघणारी हानी झाल्याचेही आ.जगताप यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *