Headlines

देशात अन् राज्यात काँग्रेसची तब्येत बिघडली:बच्चू कडूंचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले- एवढा मोठा पक्ष, पण प्रभावी उमेदवार मिळेना




विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या सध्याच्या ढासळत्या स्थितीवर थेट बोट ठेवत बच्चू कडू यांनी, महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात काँग्रेसची राजकीय तब्येत बिघडलेली दिसते आहे. राज्यामध्ये काही जागा बिनविरोध झाल्या, पण एवढा मोठा पक्ष असूनही काँग्रेसला प्रभावी उमेदवार उभा करता आला नाही. साधा उमेदवारही मिळत नाही, आणि उभा केलेल्या उमेदवारालाही रुग्णालयात दाखल व्हावं लागतं; यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती?” अशा जहरी शब्दांत काँग्रेसचा समाचार घेतला. उमेदवार डिस्चार्ज होऊनही प्रचारातून गायब निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेस या मतदारसंघात पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख हे रुग्णालयातून डिस्चार्ज झाले असले तरी त्यांनी अद्याप निवडणुकीत कोणतीही सक्रिय भूमिका घेतलेली नाही. काँग्रेसने प्रचारासाठी एकही मोठी सभा घेतलेली नाही, की जिल्ह्याबाहेरील एकही बडा नेता अद्याप प्रचारात उतरलेला नाही. उमेदवार स्वतः आजारी असल्याने घरीच राहून केवळ ‘डिजिटल प्रचारा’चा दावा करत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. वंचितला पाठिंबा मिळणार का? देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे, जर काँग्रेसने या निवडणुकीत ‘वंचित बहुजन आघाडी’ला पाठिंबा दिलाच, तर अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख यांची पुढची भूमिका काय असणार? बच्चू कडू यांनी काँग्रेसच्या या घसरत्या राजकीय स्थितीमागे पक्षाच्या चुकीच्या रणनीती आणि वेळोवेळी घेतलेल्या चुकीच्या राजकीय भूमिकांना जबाबदार धरले आहे. काँग्रेसच्या या अजब कारभारामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. अमरावतीत काँग्रेसमध्ये मतफुटीची भीती; भाजपला लॉटरी लागणार? याच संपूर्ण राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, अमरावतीतील काँग्रेस नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतफूट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाचा प्रचार थंड असल्याने आणि नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने काँग्रेसची मते फुटून त्याचा थेट आणि मोठा फायदा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा रंगू लागली आहे. 22 जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी, नीट री-एक्झाममुळे निर्णय: मेसेज एडिट फीचर देखील 30 जूनपर्यंत बंद भारत सरकारने NEET-UG च्या पुनर्परीक्षेच्या संदर्भात भारतात टेलिग्राम मेसेजिंग ॲपच्या वापरास तात्पुरती बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने मंगळवारी एक प्रेस रिलीज जारी करून ही माहिती दिली. NTA ने सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69A अंतर्गत टेलिग्रामवर बंदी घातली आहे. ही बंदी 22 जून 2026 पर्यंत लागू राहील. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *