![]()
माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी लेखी म्हणणे सादर न केल्यामुळे ही सुनावणी आता बुधवारी (22 मे) सत्र न्यायालयात होणार आहे. गुलटेकडी परिसरातील ठेकेदार खलील रज्जूलाल शेख (वय 65) यांच्या आत्महत्येप्रकरणी धंगेकर दाम्पत्यावर आरोप आहेत. या प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांनी अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांच्या न्यायालयात हा अर्ज सादर करण्यात आला आहे. धंगेकर यांच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला की, आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांचे नाव नाही आणि या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नाही. त्यांना राजकीय द्वेषातून गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा दावाही करण्यात आला. ‘तोतल्या’ म्हटल्याच्या रागातून तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण शिवाजीनगर येथील वदारवाडी भागात मित्राला ‘तोतल्या’ या टोपणनावाने हाक मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून चिडलेल्या चौघांनी एका प्लंबर काम करणाऱ्या तरुणाला आणि त्याच्या मित्रांना लोखंडी रॉड व सिमेंट ब्लॉकने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी प्रथम उर्फ आकाश उर्फ तोतल्या विटकर (वय 24), तुषार विटकर (वय 26), विजय उर्फ विकास विटकर (वय 24) आणि सोहम विटकर (वय 19, सर्व रा. वदारवाडी, पुणे) यांच्यावर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आयुष विठ्ठल चव्हाण (वय 24, धंदा- प्लंबर काम, रा. ओम रेसिडेन्सी, बी विंग, पहिला मजला, रूम नंबर 102, महादेव नगर, नांदेड फाटा, सिंहगड रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे .
Source link
धंगेकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलली:पोलिसांचे म्हणणे सादर न झाल्याने आता बुधवारी सुनावणी