Headlines

नसरापुरात चिमुकलीसोबत नेमके काय घडले?:पोलिसांनी कुणालाही कळू न देता आरोपीला मध्यरात्री घटनास्थळी नेले; सीन रिक्रिएट केला




पुण्यातील नसरापुरात एका साडे 3 वर्षीय मुलीवर एका 65 वर्षीय नराधमाने बलात्कार करून तिची हत्या केली आहे. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत असताना पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री अचानक आरोपीला घटनास्थळी नेऊन प्रस्तुत घटना कशी घडली? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून गुन्ह्याची खडानखडा माहिती घेऊन पोलिस आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहेत. पु्ण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे गत 1 मे रोजी भीमराव कांबळे नामक आरोपीने साडेतीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपीने तिचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाखाली लपवला होता. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. तिथे त्याची कसून चौकशी सुरू आहे. पण ही घटना नेमकी कशी घडली? हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री कुणालाही थांगपत्ता न लागू देता आरोपीला प्रत्यक्ष घटनास्थळी नेऊन सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आरोपीकडून मृत चिमुकली कुठे खेळत होती? तिला कुठून सोबत घेतले? व गाईच्या गोठ्यात कसे आणले? या विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली. त्यात काही नवी माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचा दावा केला जात आहे. ही माहिती उद्या 7 मे रोजी पोलिसांकडून कोर्टात सादर केली जाण्याची शक्यता आहे. कारण, आरोपीची पोलिस कोठडी संपत असल्यामुळे पोलिस त्याला उद्या कोर्टात सादर करणार आहेत. यावेळी पोलिसांकडून आरोपीची पुन्हा कोठडी मागितली जाण्याचीही शक्यता आहे. चिमुकली सुट्ट्यांमध्ये आली होती आजीकडे मृत चिमुकली पुण्यात आपल्या आई-वडिलांसोबत राहते. पण सध्या शाळेला उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे ती नसरापूर येथे आपल्या आजी-आजोबांकडे आली होती. आरोपीने 1 मे रोजी तिची बलात्कारानंतर दगडाने ठेचून हत्या केली. या प्रकरणी तिचा प्राथमिक शवविच्छेदन अहवालाही समोर आला आहे. त्यात आरोपीने चिमुकलीच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबून अत्याचार केल्याचा व त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीवर जोरदार बुक्की मारल्याचे निष्पन्न झाले आहे. घटना घडली त्याच गोठ्यात आरोपीचे वास्तव्य प्रस्तुत घटना ज्या गोठ्यात घडली त्याच गोठ्यात आरोपी काही दिवसांपासून राहत होता. तिथे त्याचे कपडे व इतर साहित्यही आढळले आहे. त्याला तेथील एकेठिकाणी विटा उचलण्याचे काम मिळाले होते. त्याने सलग 3 दिवस हे काम केले. हे काम संपताच त्याने चिमुकलीला गोठ्यात आणले व तिथे तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली. तत्पूर्वी, त्याने तिला गाठी शेव खाण्यास दिल्याचीही चर्चा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *