![]()
पैठण तालुक्यातील नांदर येथील एका २८ वर्षीय शेतकरी पुत्राने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. अहमद लतीफ शेख (२८, रा. नांदर) असे मृत तरुणाचे नाव आहे. अहमद याने बुधवारी दिवसभर शेतात काम केले. मात्र, सायंकाळ झाली तरी तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी शेतात व परिसरात शोध सुरू केला. शोध घेताना कुतुबखेडा शिवारातील मुसा शेख यांच्या शेतातील विहिरीजवळ अहमदचा मोबाईल आणि चावी आढळून आली. याबाबत नांदरचे पोलिस पाटील गोपाळ वैद्य आणि कुतुबखेडाचे पोलिस पाटील एकनाथ काशिद यांना माहिती देण्यात आली. त्यांनी ग्रामस्थांसह विहिरीजवळ धाव घेतली असता, अहमदचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच पाचोड ठाण्याचे जमादार ताराचंद घडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाचोड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, सपोनि सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार ताराचंद घडे आणि त्यांचे सहकारी तपास करत आहेत.
Source link
नांदरच्या युवकाने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या:कारण अस्पष्ट: पाचोड ठाण्यात अकस्मात नोंद