![]()
हरणबारी धरण शंभर टक्के भरल्याने ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यावरून ६,२२१ क्युसेसचा विसर्ग सुरु आहे. मोसम नदीवरील जवळपास १५ बंधारे तुडूंब भरल्याने २५ पेक्षा अधिक गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांना पिण्याच्या पाण्याचे संकट दूर झाले आहे. २५ पेक्षा अधिक गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांना लाभ. बागलाण तालुक्यात मुसळधार पाऊस झाला नसला तरी हरणबारी पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे हरणबारी धरण तुडूंब भरून ओसंडून वाहत असल्याने मोसम नदीला पूर आला आहे. या पुरामुळे ताहाराबाद, आसखेडा, सोमपूर, ब्राह्मणपाडे, मोराणे, कोठरे, वळवाडे, वडनेर-खाकुर्डी, वडगाव आदी गावातील बंधारे तुडूंब भरून वाहू लागले आहे. त्यामुळे या गावातील व नजिकच्या गावातील पाणीपुरवठा योजनांना जीवदान मिळून पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. वडेल या मुख्य गावांसह परिसरातील गावांना लाभ होणार आहे. हरणबारी धरणातून विसर्ग सुरू असल्याने मोसम नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे ब्राह्मणपाडे जवळील वाघळे बांधाऱ्याचे नयनमनोहर दृश्य. छाया – जयवंत खैरनार
Source link
ओव्हरफ्लो:हरणबारीतून 6,221 क्युसेक विसर्ग, मोसमवरील 15 बंधारे तुडूंब