![]()
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे शहरातील रस्त्यांची विदारक स्थिती झाली आहे. त्यामुळे अपघातात ५ जणांनी जीव गमावले. त्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाने गुरुवारी महापालिका प्रशासनाविरोधा आंदोलन केले. खडयांमुळे मृत पावलेल्या व्यक्तींचे फोटो सोबत आणत ते महापौर दालनातील खुर्चीवर ठेवण्यात आले. प्रशासन किती जणांचा बळी घेणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. दोषींवर कठोर कारवाई होणार- गिरीश महाजन खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये झालेल्या दुर्घटना अतिशय दुर्देवी आहेत. त्यांना जबाबदार असलेले सर्व ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. शनिवारी नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळा बैठकीत सर्व कामांचा आढावा घेतला जाईल. त्यावेळी या स्थितीबाबतही सविस्तर चर्चा होईल. महापौर व आयुक्तांना संबंधितांवर कारवाईबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. – गिरीश महाजन, कुंभमेळा मंत्री
Source link
नाशकात खड्ड्यांमुळे 5 मृत्यू; ठाकरे गटाचे आंदोलन:दोषींवर कठोर कारवाई होणार; कोणाचीही गय करणार नाही- गिरीश महाजन