Headlines

कौतूक:खात्यावर आलेले 4 लाख केले परत; प्रकाश दहिहंडे यांचा सत्कार




टाकळी बु. येथील प्रकाश जयसिंग दहीहंडे यांच्या बँक खात्यावर नजरचुकीने जमा झालेले चार लाख त्यांनी प्रामाणिकपणे मूळ मालक मोनिका प्रकाश शिरसाट यांना आरटीजीएसद्वारे परत केले. हा प्रकार शाखा व्यवस्थापक येडूबा जाधव, इन्स्पेक्टर विजय शिंदे व क्लर्क मधुकर सुरे यांच्या निदर्शनास आणून पैसे परत करण्यात आले. या प्रामाणिकपणाबद्दल आमदार संजना जाधव यांच्या हस्ते प्रकाश दहीहंडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जि.प. सदस्य रावसाहेब पवार, शिवाजी थोरात, गजानन म्हस्के, बाबूराव बनकर, जगन जंगले, राजू गाडेकर, वीरेंद्र खंबाट, साहेबराव गायकवाड, दीपक धुमाळ, विनोद टोम्पे, विजयसिंग बिघोत व डॉ. नवनाथ दहीहंडे उपस्थित होते. प्रामाणिकपणाबद्दल दहीहंडे यांचे कौतूक होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *