![]()
नागपूर बसस्थानकातून एसटी महामंडळाची तब्बल दीड कोटी रुपयांची ‘शिवाई’ ही इलेक्ट्रिक बस चोरीला गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा तपास करत अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी चोरी गेलेल्या या बससह एका आंतरराज्यीय चोरट्याला शिताफीने अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या या सराईत चोरट्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि तपासादरम्यान त्याने दिलेली धक्कादायक माहिती ऐकून पोलिस अधिकारीही पूर्णपणे चक्रावून गेले आहेत. 1 जुलैच्या रात्री नागपूरच्या इमामवाडा बसस्थानकातील चार्जिंग स्टेशनवर उभी असलेली ‘एमएच 49/ बी. झेड. 8258’ या क्रमांकाची तब्बल 1 कोटी 53 लाख रुपये किमतीची एसटी महामंडळाची ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बस एका चोरट्याने सुरक्षा यंत्रणेची नजर चुकवून पळवून नेली. या अजब चोरीमुळे नागपूर पोलिसांची मोठी धावपळ उडाली असतानाच, अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नंदा मार्केटजवळ ही बस संशयास्पद स्थितीत उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच दरम्यान, बस चोरणारा तरुण राजापेठ परिसरातील गद्रे चौकात असल्याची गोपनीय माहिती मिळताच, राजापेठ पोलिसांच्या डीबी पथकाने तातडीने सापळा रचला आणि शिताफीने या चोरट्याला चोरी गेलेल्या बससह ताब्यात घेतले. आंध्रप्रदेशातून तब्बल 20 बसेस चोरल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या या सराईत आरोपीचे नाव विष्णू गणपती नीलावर (वय 23, रा. हयीतनगर, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) असे असून, त्याने नागपूरच्या इमामवाडा बसस्थानकातून सदर बस चोरल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. मात्र, तपासादरम्यान या आंतरराज्यीय चोरट्याने दिलेल्या माहितीने पोलीसही चक्रावून गेले. कारण त्याने यापूर्वी तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातून तब्बल 20 बसेस आणि महाराष्ट्रातील नांदेड बसस्थानकावरूनही एक बस पळवून नेल्याचे उघड झाले आहे. या अट्टल गुन्हेगारावर वजिराबाद, सीसीएस पोलिस स्टेशन तिरूमला यासह इतर अनेक पोलिस ठाण्यांमध्ये आधीपासूनच विविध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. बसची चार्जिंग संपल्यावर बॅटरी काढून विकायचा नागपूरच्या इमामवाडा डेपोतून गुरुवारी मध्यरात्री साडेतीन वाजताच्या सुमारास एसटी महामंडळाची ‘शिवाई’ ई-बस चोरीला गेली होती. मात्र, नागपूर आणि अमरावती पोलिसांच्या सतर्कतेमुळे अमरावतीच्या राजापेठ येथे या चोरीच्या बससह एका कुख्यात आंतरराज्यीय चोरट्याला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. विष्णू गणपती निलावार (वय 22, रा. हयात नाका, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वीच 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. ई-बसेस चोरून त्या घेऊन फिरणे आणि बसची चार्जिंग संपल्यावर तिचे महागडे टायर तसेच बॅटरी काढून विकणे, अशी या अट्टल चोरट्याची गुन्हेगारी पद्धत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम’ने लागला शोध या गुन्ह्याची उकल करण्यात एसटी महामंडळाच्या अद्ययावत तंत्रज्ञानाची मोठी मदत झाली. महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम’ बसवण्यात आलेली आहे. या सिस्टीममधील चीपच्या माध्यमातून बसचे रिअल-टाइम लोकेशन आणि अचूक माहिती अधिकाऱ्यांना मिळते. बस डेपोतून गायब झाल्याचे निदर्शनास येताच नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी तात्काळ या हायटेक ट्रॅकिंग प्रणालीचा वापर केला. याच प्रवासात बसची चार्जिंग संपल्याने ती रस्त्यातच थांबली होती. या अचूक माहितीच्या आणि समन्वयाच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला रंगेहाथ पकडले. पोलिसांनी कसे केले बसला ट्रॅक? मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मध्यरात्री साडेतीन वाजताच्या सुमारास एका चोरट्याने नागपूरच्या इमामवाडा डेपोतील ई-बस (एम. एच. 49, बी. झेड-8258) पळवून थेट अमरावतीच्या दिशेने सुसाट वेगाने पोबारा केला. सकाळी 9 वाजेपर्यंत सदर बस आगारात न परतल्याने सुरक्षारक्षक सुरेंद्र मिश्रा यांनी तात्काळ आगार व्यवस्थापक इमरान पटेल यांना याबाबतची माहिती दिली. सुदैवाने, या ई-बसमध्ये इलेक्ट्रॉनिक चीप बसवलेली असल्याने अधिकाऱ्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून तिचे लोकेशन तपासले, तेव्हा ती अमरावतीजवळ असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर नागपूर कंट्रोल रूमने तातडीने अमरावती पोलिसांना अलर्ट केले आणि मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे राजापेठ पोलिसांनी या आरोपीला चोरीच्या बससह शिताफीने अटक केली.
Source link
नागपुरातून एसटीची दीड कोटींची ई-बस चोरीला!:बसमधील ट्रॅकिंग सिस्टीममुळे लागला शोध, आंतरराज्यीय सराईत चोराला बेड्या