![]()
नागपूरमध्ये एक धक्कादायक घडली आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून एका माजी भाडेकरूने आपल्या पूर्वीच्या घरमालकाच्या घरात थेट घुसून तलवार आणि चाकूने जीवघेणा हल्ला केला. या भयंकर हल्ल्यात घरी पाहुणी म्हणून आलेल्या घरमालकाच्या मेहुणीचा रक्ताच्या थारोळ्यात जागीच मृत्यू झाला. तर, घरमालक आणि त्यांची पत्नी या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हा अंगावर काटा आणणारा संपूर्ण प्रसंग सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, परिसरातील तरुणांच्या सतर्कतेमुळे आरोपीला घटनास्थळावरूनच बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. नेमका थरार कुठे आणि कसा घडला? ही थरारक घटना नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अमरनगर परिसरात मंगळवारी सकाळी घडली. धर्मपाल डहाट (घरमालक), त्यांची पत्नी वनिता डहाट आणि त्यांच्या घरी पाहुण्या म्हणून आलेल्या मेहुणी संगीता राजू चौधरी हे तिघे घरात उपस्थित होते. त्याचवेळी डहाट यांचा माजी भाडेकरू रोशन नीळकंठराव तराळ हा अचानक हातात तलवार आणि चाकू घेऊन घरात शिरला. कुणालाही काही समजण्याच्या आतच त्याने या तिघांवरही सपासप वार करण्यास सुरुवात केली. संगीता चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू या प्राणघातक हल्ल्यात संगीता चौधरी यांच्या वर्मी घाव लागल्याने त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यातच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या हल्ल्यात घरमालक धर्मपाल आणि त्यांच्या पत्नी वनिता हे दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हत्येचे कारण अत्यंत क्षुल्लक पोलिसांच्या प्राथमिक तपासात या भीषण हल्ल्यामागचे कारण अत्यंत क्षुल्लक असल्याचे समोर आले आहे. आरोपी रोशन तराळ हा पूर्वी डहाट कुटुंबाकडे भाड्याने राहायचा. त्या वेळी घरात मोठ्या आवाजात रेडिओ लावण्याच्या कारणावरून घरमालक आणि भाडेकरू रोशन यांच्यात मोठा वाद झाला होता. याच जुन्या वादाचा राग रोशनने मनात धरून ठेवला होता आणि त्यातूनच त्याने हे टोकाचे आणि क्रूर पाऊल उचलले. स्थानिकांचे धाडस आणि आरोपीला अटक हातात धारदार शस्त्रे घेऊन घरात घुसतानाचा आणि हल्ला करत असल्याचा रोशनचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. विशेष म्हणजे, एवढा भीषण आणि रक्तरंजित हल्ला केल्यानंतर आरोपी रोशन पळून न जाता घरातच शांत बसून राहिला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच परिसरातील तरुणांनी आणि नागरिकांनी धाडस दाखवले. त्यांनी प्रसंगावधान राखून आरोपीला बाहेरून त्याच खोलीत कोंडून ठेवले आणि तत्काळ एमआयडीसी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडून आरोपी रोशनला ताब्यात घेतले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक आणि सखोल तपास करत आहेत. हेही वाचा.. घरगुती वाद सोडवण्याच्या रागातूनमुलाने केली वृद्ध वडिलांची हत्या:चिंचवण येथील घटना, मुलाने दुचाकी नेल्याने आरोपी करीत होता पत्नीला मारहाण मुलाने दुचाकी नेल्यामुळे त्याच्या संतप्त वडिलाने स्वतःच्या पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली.या वेळी वाद सोडवण्यासाठी वृद्धाने मध्यस्थी केली. याचा राग आल्याने डोक्यात व चेहऱ्यावर विटांनी मारहाणकरून पोटच्या मुलानेच वृद्ध पित्याची हत्या केल्याची घटना वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे २७ जुलै रोजी घडली. श्रीकिसन भागोजी कोठुळे (७०, रा.चिंचवण) असे मृत वृद्धाचे नाव असून,फुलचंद श्रीकिसन कोठुळे असे गुन्हादाखल झालेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. सविस्तर वाचा
Source link
नागपूर हादरले:माजी भाडेकरूचा घरमालकासह तिघांवर सपासप वार, महिलेचा जागीच मृत्यू; घटना CCTVत कैद