![]()
नाशिक आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी टीसीएसमध्ये उघडकीस आलेल्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या तौसीफ खानचा एक जुना व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये तो एका हिंदू तरुणाचे धर्मांतर करत असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण केशरी रंगाचा कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. या तरुणाला तौसीफ खान मुस्लिम धर्माचे आचरण करण्यास भाग पाडत असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येते. हा व्हिडिओ तौसीफच्या धर्मांतराचा पुरावा मानला जात आहे. काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये? गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने पसरत आहे. यामध्ये एक तरुण केशरी रंगाचा कुर्ता परिधान केलेला दिसत असून, तौसीफ खान त्याला मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजांचे पालन करण्यास सांगताना दिसत आहे. हा व्हिडिओ तौसीफने जाणीवपूर्वक चित्रीत केला असून, तो संबंधित तरुणाचे धर्मांतर करत असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओमुळे पोलिस तपासाला आता एक ठोस दिशा मिळाली आहे. रोजा, नमाज आणि बीफची सक्ती या प्रकरणात समोर आलेल्या पीडित तरुणाने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटलंय की, तौसीफने त्याला बळजबरीने रोजा धरायला लावला आणि कामाच्या ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी दबाव टाकला. धर्मांतर करण्यासाठी त्याला बळजबरीने बीफ खायला घातल्याचा गंभीर आरोपही या तरुणाने केला आहे. हिंदू धर्माबद्दल चुकीची माहिती देऊन आणि मुस्लिम धर्माचे श्रेष्ठत्व पटवून देऊन त्याचे ब्रेनवॉशिंग करण्याचा प्रयत्न तौसीफ आणि फरार आरोपी निदा खान यांनी केल्याचे समोर आले आहे. एनआयएकडून चौकशी सुरू टीसीएस कंपनीतील धर्मांतर, तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे पोलिसांनी एनआयएकडे (राष्ट्रीय तपास संस्था) दिली. आरोपींना पैशांचा पुरवठा आणि परदेशातून होत असलेली मदत या विषयीची ही कागदपत्रे आहेत. त्यावरून चौकशी सुरू झाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे पथकही शुक्रवारी नाशिकमध्ये येत आहे. दरम्यान, मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी रझा रफिक मेमन, शफी शेखला 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. महिला आयोगाच्या समितीत निवृत्त न्यायाधीशांसह 4 सदस्य राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणी ‘सुओ मोटो’ दखल घेतली आहे. अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश साधना जाधव, हरियाणाचे माजी पोलिस महासंचालक बी. के. सिन्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या वकील ॲड. मोनिका अरोरा आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या वरिष्ठ समन्वयक लीलाबती यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. ती आज (दि. 17) नाशिकमध्ये टीसीएस कंपनीसह संबंधित ठिकाणी चौकशी करेल. अधिकाऱ्यांशी चर्चाही करेल. त्याचा अहवाल रहाटकर यांना सादर केला जाईल.
Source link
नाशिक टीसीएस 'कॉर्पोरेट जिहाद' प्रकरण:धर्मांतर प्रकरणाचा जुना व्हिडिओ व्हायरल; केशरी कुर्ता परिधान केलेल्या तरुणावर 'इस्लामिक' संस्कारांचा दबाव?