Headlines

‘निवडणूक जिंकल्यावर आयोग चांगला, हरल्यानंतर वाईट?:निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरून नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा




निवडणूक आयोगाच्या विरोधात 4 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे मोर्चा काढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार निवडून आले, त्यावेळी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा का काढला नाही, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. निवडणूक जिंकल्यानंतर आयोगाबाबत काही न बोलता निवडणूक हरल्यानंतरच आयोगावर प्रश्न उपस्थित केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. केरळमध्ये काँग्रेस विजयी झाली किंवा कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आली, त्या वेळी निवडणूक आयोगाबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते का, असा सवालही राणे यांनी केला. ‘जेव्हा जेव्हा हे लोक इलेक्शन जिंकतात, तेव्हा इलेक्शन कमिशनबद्दल काही बोलत नाहीत,’ असे ते म्हणाले. निवडणूक आयोग ही देशातील महत्त्वाची संस्था असल्याचे सांगत या संस्थेबाबत आरोप-प्रत्यारोप करून देशाच्या लोकशाहीविषयी प्रश्न निर्माण होऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी टीका केली. उद्धव ठाकरे 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याबाबत विचारले असता, ‘लोकसभेच्या नंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्याची हिंमत दाखवली का? कारण स्वतःचे खासदार निवडून आले होते,’ असा सवाल राणे यांनी केला. सिंधुदुर्गातील दुष्काळावर प्रशासनाचे नियोजन दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवरही नितेश राणे यांनी माहिती दिली. ‘ट्रिगर-1’मध्ये जिल्ह्यातील 8 ही तालुक्यांचा समावेश झाल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्रित बैठक घेऊन पुढील नियोजन केले आहे. दुष्काळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना कसा करायचा, त्यावर कोणत्या उपाययोजना करायच्या आणि शासनाकडून मदत जाहीर झाल्यानंतर कोणताही नागरिक मदतीपासून वंचित राहू नये, यावर बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला आमदार निलेश राणे, दीपक केसरकर, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. ‘सिंधुदुर्ग म्हणून सगळ्यांनी एकत्र बसून येणाऱ्या संकटाचा सामना करण्याचे नियोजन केले आहे,’ असे नितेश राणे म्हणाले. प्रत्येकजण फिल्डवर उतरून झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार असून, शासनाकडून मदत जाहीर झाल्यानंतर ती जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तळांबा धरणाबाबत जनतेशी चर्चा करून निर्णय तळांबा धरणाच्या कामाला गती देण्याबाबत विचारले असता, नितेश राणे यांनी हा विषय जनतेच्या कोर्टात असल्याचे सांगितले. धरणाचे जवळपास 24 टक्के काम पूर्ण झाले आहे. यापूर्वी या प्रकल्पाला विरोध आणि आंदोलन झाले असल्याने संबंधित नागरिकांशी पुन्हा चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘ज्या गोष्टी जनतेला मान्य नसतील त्या मायनस करू, ज्या हव्या असतील त्या करू. जनतेला हा विषय हवा असेल तर हा विषय पुढे नेऊ,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. आदित्य ठाकरेंच्या टीकेवर राणेंचा पलटवार सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या जीआरवरून आदित्य ठाकरे यांनी सरकार गोंधळले असल्याची टीका केल्याबाबतही नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आज संकटाचा काळ आहे. कोणीही या बाबतीत राजकारण करू नये,’ असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील 250 ते 265 तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे सांगत, या संकटाच्या काळात सरकारच्या उपाययोजनांना सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘उगाच टीकेला टीका करण्यापेक्षा चांगलं होत असेल त्याला साथ द्यावी. चांगल्याला चांगलं म्हणा,’ असे राणे म्हणाले. मराठवाडा, विदर्भातील मच्छिमारांच्या नुकसानीचा घेणार आढावा दुष्काळाचा मराठवाड्यातील मच्छिमारांनाही फटका बसल्याबाबत नितेश राणे यांनी उद्यापासून मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले. छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथून दौऱ्याची सुरुवात होणार असून, संबंधित जिल्ह्यांतील मच्छिमारांच्या भेटी घेऊन तलाव आणि मत्स्यतलावांची परिस्थिती जाणून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. फेब्रुवारीमध्ये मच्छिमारांना 100 कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती. त्याचप्रमाणे यावेळी नुकसानभरपाई, कर्जमाफी आणि इतर मदतीच्या माध्यमातून मच्छिमारांना दिलासा मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मच्छिमारीला कृषीचा दर्जा देण्यात आल्याचा उल्लेख करत, शेतकऱ्यांच्या तुलनेत मच्छिमारांनाही मदत मिळावी, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. ‘राज्यातील मच्छिमारांनी चिंता करू नये, सरकार म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर उभे आहोत,’ असेही त्यांनी सांगितले. हेही वाचा… “तू माझ्यासाठी खूप केलं, आता सहन होईना..”:पत्नीला शेवटचा भावनिक मेसेज; कर्ज फेडूनही सावकारी जाचाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सोनगे येथे एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. खासगी सावकाराकडून घेतलेल्या 9 लाख रुपयांच्या बदल्यात तब्बल 26 लाख रुपये परत करूनही, आणखी 25 लाखांच्या मागणीसाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून 48 वर्षीय श्रीधर दत्तात्रय डावरे (रा. सोनगे, ता. कागल) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *