![]()
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या ‘नीट’ परीक्षा पेपर लीक घोटाळ्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाला धक्का लावणाऱ्या गंभीर घोटाळ्याच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या वतीने शुक्रवारी ५ शहरात मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या निष्काळजीपणाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) येथून या मशाल मोर्चाला सुरुवात झाली. हातात मशाली आणि केंद्र सरकारविरोधी फलक घेऊन शेकडो विद्यार्थ्यांसह विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. पुढे हा मोर्चा जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला. मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि एनटीएच्या कारभाराविरोधात अत्यंत आक्रमक घोषणाबाजी केली, तसेच मोर्चा जयस्तंभ चौक परिसरात आल्यानंतर संत्प्त मोर्चेकऱ्यांनी काही वेळ मुख्य मार्गावर बसून रास्तारोको आंदोलन केले. यामुळे काही काळासाठी मुख्य शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच परिसर दणाणून गेला होता. या मोर्चामध्ये विद्यार्थी, युवक, पालक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, कॉग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, उपाध्यक्ष संकेत कुलट, जिल्हाध्यक्ष सर्वेश खांडे यांच्यासह निलेश गुहे, वैभव वानखडे, उत्कर्ष देशमुख, रितेश पांडव, शैलेश काळबांडे, नितीन काळे, अनिकेत ढेंगळे, नितेश वानखडे, फिरोज शहा, योगेश बुंदीले, रोशन पिठेकर यांच्यासह कॉग्रेस, एनएसयूआयचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली होती. एनएसयूआयच्या या आहेत प्रमुख मागण्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. भ्रष्टाचाराचे केंद्र बनलेली नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तात्काळ बरखास्त करण्यात यावी.‘नीट’ परीक्षेतील घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय दिला जावा.
Source link
‘नीट’चा पेपरलीक विरोधात एनएसयूआयचा मशाल मोर्चा:मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह ‘एनटीए’ बरखास्तीची केली मागणी