![]()
विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा योग्य व शिस्तबद्ध पद्धतीने उपयोग करून क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाचे, संस्थेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. नेमबाजीसारख्या खेळामुळे एकाग्रता, संयम, अचूकता, आत्मविश्वास या गुणांचा विकास होतो, असे मनोगत श्री शिवा
.
खेळाडू विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्यासोबतच नेमबाजीसारख्या कौशल्याधारित खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या आधुनिक शूटिंग रेंज सेंटरचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले होते. या कार्यक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रवींद्र कडू ,संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. भय्यासाहेब पुसदेकर ,संस्थेचे सदस्य प्रा. सुभाष बनसोड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे स्वीकृत सदस्य प्राचार्य अमोल महल्ले, प्रा. नरेश पाटील, संस्थेचे सचिव डॉ. विजय ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी महाविद्यालयात आधुनिक शूटिंग रेंज सेंटर उभारण्यामागील उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना नेमबाजी या खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, सराव व स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या केंद्राचे महत्त्व अधोरेखित केले.
यानंतर प्रमुख पाहुणे डॉ.रवींद्र कडू यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाने क्रीडा क्षेत्रात राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. आधुनिक शूटिंग रेंज सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धांसाठी आवश्यक प्रशिक्षण मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी मनोगतात महाविद्यालयात आधुनिक क्रीडा सुविधांची भर पडत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शूटिंग रेंज सेंटरच्या माध्यमातून गुणवंत खेळाडूंना योग्य प्रशिक्षण मिळून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्याची संधी निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र राऊत यांनी केले व आभार प्रदर्शन मिशन ऑलम्पिक अमरावतीचे सचिव दीपक अत्राम यांनी केले.
या कार्यक्रमाला स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयाचे प्राचार्य तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व स्थानिक महाविद्यालयातील आय.क्यू.एसी, समन्वयक डॉ. पुष्पलता देशमुख यांच्या सोबत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, क्रीडा विभागातील प्रशिक्षक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात पिस्टलद्वारे अध्यक्ष्यांची अचूक नेमबाजी उद्घाटनप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षांनी पिस्टलद्वारे शूटिंग रेंजमध्ये अचूक लक्ष्य साधत एकापाठोपाठ एक योग्य टार्गेटवर फायर करून नेमबाजी खेळातील आपले कौशल्य प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या या प्रात्यक्षिकामुळे उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अध्यक्ष नेमबाजीत किती निष्णात आहेत, हेच त्यांच्या या खेळातील कौशल्यातून दिसून आले.