Headlines

पसंतीच्या दुचाकी क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जाणार:आज दुपारी 2.30 पर्यंत खिडकी क्र. 25 वर संधी




अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (RTO) दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी इच्छुक वाहनधारकांकडून आज, सोमवार, २५ मे रोजी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. हे अर्ज सकाळी १० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत खिडकी क्रमांक २५ वर जमा करता येतील. अर्ज करताना वाहन मालकाच्या नावाचा अर्ज, पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे. पसंती क्रमांकासाठीचे विहित शुल्क अमरावती कॅम्प ब्रँच, ट्रेझरी ब्रँच कोड क्रमांक ००३८६६ करिता देय असलेल्या डिमांड ड्राफ्टद्वारे भरणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्यांची यादी सोमवारी सायंकाळी ४ वाजता घोषित केली जाईल. या यादीमध्ये ज्या पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज प्राप्त झाला आहे, तसेच ज्या क्रमांकांसाठी एकापेक्षा जास्त अर्ज आले आहेत, अशा सर्वांचा समावेश असेल. ही यादी आरटीओ कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध असेल. एकाच क्रमांकासाठी दोन किंवा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास, मंगळवार, २६ मे रोजी दुपारी १.३० वाजेपर्यंत मूळ शुल्काव्यतिरिक्त जादा रकमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात खिडकी क्रमांक २५ वर जमा करावा लागेल. दुपारी ३ वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात हे लिफाफे उघडले जातील. सर्वाधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट असलेल्या अर्जदाराला तो पसंती क्रमांक दिला जाईल, तर उर्वरित अर्जदारांचे डिमांड ड्राफ्ट परत केले जातील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *