Headlines

पहाटे आरोपींना अटक, 3 दिवस पोलिस कोठडी:खोट्या हिबानाम्याद्वारे 100 कोटींची जमीन लाटणाऱ्यासह एजंट अटकेत, सहदुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांसह 7 जणांवर गुन्हा दाखल



नोंदणी विभागात बनावट हिबानामा (बक्षीसपत्र) सादर करून आणि मूळ जमीन मालकाच्या जागी तोतया व्यक्ती उभा करून हिरापूर येथील तब्बल १०० कोटी रुपयांची ५ एकर जमीन लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सिटी चौक पोलिस ठाण्यात खरेदीदार, साक्षीदार, दस्त तया

.

या प्रकरणी अली असगर सैफुद्दीन पेटीवाला (रा. बुऱ्हाणी कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या कुटुंबाची हिरापूर येथील गट क्रमांक ३१ मध्ये एकत्रित ७ हेक्टर ४६ आर जमीन आहे. यातील २ हेक्टर ११ आर शेतजमीन अली असगर यांच्या वाट्याला आली आहे. आरोपी मोहंमद नूर मोहंमद हनीफ याने यातील ५ एकर जमिनीचा बनावट हिबानामा आणि खोटी कागदपत्रे तयार केली. २७ मे रोजी सायंकाळी ४ ते ६ यादरम्यान सह दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १ मध्ये रजिस्ट्रीच्या वेळी मूळ मालकाऐवजी एका अनोळखी व्यक्तीला उभे केले. रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि एजंट जुनेद खान यांच्या संगनमताने बनावट सह्या करून हा १०० कोटींचा दस्त नोंदवून घेतल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

याप्रकरणी मुख्य खरेदीदार मोहंमद नूर मोहंमद हनीफ (४७, रा. हुसैन कॉलनी, गारखेडा), बनावट दस्त तयार करणारा एजंट अब्दुल काशीम खान उर्फ जुनेद अब्दुल रहेमान खान (३५, रा. मोमीनपुरा) याना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यात साक्षीदार शेख फेरोज शेख उस्मान (रा. संजयनगर), मुजम्मील खान रफिक खान (रा. मोती कारंजा), रजिस्ट्री कार्यालयातील संशयित अधिकारी आणि अली असगर यांच्या जागी उभा केलेला व्यक्ती यांचा पोलिस शोध घेत आहेत. सिटी चौक पोलिसांनी गुरुवारी पहाटे दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई

नोंदणी विभागात मागील काही महिन्यांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करण्याचे रॅकेट सक्रिय झाले आहे. अनेकदा अधिकारी आपला संबंध नसल्याचे दाखवतात. मात्र, अशा १६ संशयास्पद प्रकरणांची तक्रार थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली होती. महसूलमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन कडक कारवाईचे आदेश दिले. त्यांनी महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याची माहिती आहे. यानंतर तातडीने आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी पहाटे त्यांना बेड्या ठोकल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *