Headlines

'पांढऱ्या पट्टी'चा वाद:जैनांची बाजू घेतल्याने महिलेला शिवीगाळ अन् धमकी? प्रसाद वेदपाठक यांच्यावर गुन्हा दाखल




मुंबईत गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या ‘पांढऱ्या पट्टी’च्या वादात आता एक घडामोड समोर आली आहे. जैन साधू-साध्वींसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा मुद्दा सर्वप्रथम उचलून धरणारा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक याच्यावरच आता घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैनांची बाजू घेतल्याच्या रागातून एका वकील महिलेला धमकावल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. नेमकं काय आहे प्रकरण?
प्रसाद वेदपाठक राहतो त्याच घाटकोपरमधील ‘कैलास अव्हेन्यू’ सोसायटीमध्ये राहणाऱ्या वकील कृपा याज्ञिक यांनी ही पोलिसांत तक्रार दिली आहे. याज्ञिक यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा प्रसादने पांढऱ्या पट्टीचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा त्याने त्यांचेही मत विचारले होते. मी हिंदू असले तरी कुणाला या पट्टीमुळे मदत होत असेल, तर यात मला काहीच गैर वाटत नाही. यात धर्म आणायची गरज नाही, असे मत याज्ञिक यांनी मांडले होते. मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून प्रसादने ‘तू जैन समाजाला साथ दिलीस’, असे म्हणत त्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. घरी येऊन शिवीगाळ अन् धमक्या…
तक्रारदार वकील कृपा याज्ञिक यांनी माध्यमांना सांगितले की, हा विषय संपल्यानंतर 10 जून रोजी सोशल मीडियावर मास रिपोर्टिंग सुरू झाले, त्यात मीही सहभागी होते. त्यानंतर प्रसादने मला थेट टार्गेट केले. ‘तू हिंदू असून असं केलंस, त्यामुळे माफी माग, नाहीतर तुला खूप भोगावे लागेल’, अशी धमकी त्याने दिली. मी माफी मागण्यास नकार दिल्यावर त्याने मला आणि माझ्या प्रोफेशनला अत्यंत अश्लील शिवीगाळ केली. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर थेट माझ्या घरी येऊन त्याने माझ्याशी भांडण केले आणि आक्षेपार्ह शब्द वापरले. या सर्व प्रकारानंतर याज्ञिक यांनी घाटकोपर पोलिसांत धाव घेत प्रसादविरोधात रीतसर तक्रार दाखल केली. कसा सुरू झाला होता ‘पांढरी पट्टी’ वाद?
प्रसाद वेदपाठक याने काही दिवसांपूर्वी घाटकोपरच्या आपल्या सोसायटीत जैन धर्मगुरूंच्या विहारासाठी परवानगी न घेता पांढरी पट्टी मारल्याचा आरोप करणारा व्हिडिओ शेअर केला होता. यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर सोसायटीतील ती पट्टी हटवण्यात आली. मात्र, प्रसादने पेटवलेली ही ठिणगी संपूर्ण मुंबईत पसरली आणि त्यानंतर दादर, गिरगाव, लालबागसह अनेक ठिकाणी मनसेने आक्रमक पवित्रा घेत पांढऱ्या पट्ट्या पुसून काढल्या. आता याच वादात स्वतः प्रसादवरच गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मुंबईत शिवरायांच्या जिरेटोप शिल्पावर जैन समाजाचा झेंडा, VIDEO:मनसे आक्रमक होताच संबंधित व्यक्तीकडून पोलिसांसमोर जाहीर माफी मुंबईतील मालाड पूर्व परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाच्या शिल्पावर जैन समाजाचा पांढरा झेंडा लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. या घटनेची माहिती मिळताच मनसेचे विभागाध्यक्ष महेश फरकासे यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि झेंडा लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत त्याच्याकडून जाहीर माफी मागून घेतली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *