Headlines

पाणीबाणी:कुरनूर 16 टक्क्यांवर; अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गीसह 35 गावांत टंचाई




पावसाळ्याचा निम्म्याहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही, अक्कलकोट तालुक्यात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या कुरनूर धरणात सध्या केवळ १६ टक्के (१३५.३८ दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा शिल्लक असून, उपयुक्त पाणीसाठा अवघा १ टक्का आहे. गेल्या वर्षी याच काळात धरण १०० टक्के भरले होते, यावरून यंदाच्या पाणीटंचाईच्या भीषण स्थितीचा अंदाज येतो. या धरणावर तीन नगरपालिका आणि ३५ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तसेच, धरण क्षेत्रातील १० गावांनाही याच पाण्याचा आधार आहे. पावसाअभावी कुरनूर धरणाखालील किणी, अक्कलकोट, निमगाव, मिरजगीसह आठ गावांतील केटीवेअर पूर्णपणे कोरडेठाक पडले आहेत. याशिवाय तालुक्यातील बोरगाव, डोंबरजवळगे, घोळसगाव, भुरीकवठेसह दहा लघु व मध्यम तलावांमध्ये पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आगामी रब्बी हंगामावरही संकट कोसळण्याची चिन्हे आहेत. जून आणि जुलै महिन्यात सरासरीपेक्षा ३१ टक्के, तर ऑगस्टमध्ये ६२ टक्के कमी पाऊस झाला आहे. वेळीच सर्वदूर आणि दमदार पाऊस न झाल्यास, आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक उग्र रूप धारण करेल. प्रशासनासह शेतकऱ्यांचे डोळे आता वरुणराजाकडे लागले आहेत.गेल्या वर्षी जुलैअखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा मात्र ऑगस्टचा मध्य उलटत आला तरी जलसाठ्याची स्थिती समाधानकारक नसल्याने रब्बी हंगामासाठी जोरदार पावसाची गरज आहे. तालुक्यातील पावसाची एकूण स्थिती अद्याप सरासरीच्या जवळही पोहोचलेली नाही. त्यामुळे खरीप पिकांसोबतच आगामी रब्बी हंगामाच्या नियोजनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होऊ नये यासाठी आता दमदार आणि सर्वदूर पावसाची आवश्यकता आहे. गेल्या वर्षी जुलैअखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा मात्र ऑगस्टचा मध्य उलटत आला तरी जलसाठ्याची स्थिती समाधानकारक नसल्याने अक्कलकोट तालुक्याचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत. आगामी काही दिवसांत जोरदार पाऊस झाला नाही, तर तालुक्यातील पाणीप्रश्न आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ^बोरगांव, डोंबरजवळगे, घोळसगांव भुरीकवठे, काझीकणबस, गळोरगी, शिरवळवाडी , हंजगी तलावात सातनदुधनी व करजगी या दहाही तलावात शून्य टक्के पाणी आहे. कुरनुर मध्यम बोरी प्रकल्पामध्ये २.८१ टक्के जिवंत साठा आहे. रोहित मन्यालवरू, उपअभियंता पाटबंधारे विभाग ^निम्मा पावसाळा झाला, मात्र लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये पाणी वाढलेले नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत होणारा पाऊस अक्कलकोट तालुक्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. धरणात केवळ १६ टक्याच्या आसपास पाणी शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत ते दहापट कमी आहे. उपयुक्त फक्त १ टक्के पाणीसाठा आहे. पृथ्वीराज शेवाळे, शाखा अभियंता कुरनूर धरणातील पाणीसाठ्यावर अक्कलकोट तालुक्यातील तीन नगरपालिका आणि ३५ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. सध्या धरणात केवळ १ टक्का उपयुक्त पाणीसाठा असल्याने येत्या काळात या सर्व गावांसमोर आणि शहरांसमोर पिण्याच्या पाण्याचे अत्यंत भीषण संकट उभे राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाला आतापासूनच पर्यायी व्यवस्थांचे नियोजन करावे लागणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *