Headlines

पाथर्डीत बस उलटली:15 जखमी, दोघे गंभीर




पाथर्डी शेवगाव-तिसगाव मार्गावरील वृद्धेश्वर साखर कारखान्यानजीक मंगळवारी (२ जून) दुपारी चार वाजेच्या सुमारास ५२ प्रवाशांनी भरलेली शेवगाव आगाराची एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. या भीषण अपघातात १५ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघात होताच बसमधून डिझेलची मोठी गळती सुरू झाल्याने परिसरात एकाचच खळबळ उडाली होती. मात्र, स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे ५२ प्रवाशांचे प्राण वाचले. शेवगाव आगाराची एसटी बस (क्र. एमएच १४ बीटी ४१२६) ५२ प्रवाशांना घेऊन अहिल्यानगरच्या दिशेने चालली होती. वृद्धेश्वर कारखान्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. जीव वाचवण्यासाठी काही प्रवाशांनी बसच्या खिडक्यांमधून थेट बाहेर उड्या मारल्या. बस पलटी झाल्यानंतर टाकीतून वेगाने डिझेल गळू लागले होते. उन्हाची वेळ असल्याने आगीचा भडका उडण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. अशा अत्यंत संवेदनशील परिस्थितीत स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेले वृद्ध, महिला आणि बालकांना स्थानिक तरुणांनी खिडक्यांच्या वाटेने आणि मागच्या बाजूने सुखरूप बाहेर काढले. रंगनाथ चितळे, राजेंद्र तुपे, गणेश काकडे, अनिल राजळे, ऋषिकेश शिरसाठ यांच्यासह जवळपास दोन डझन तरुणांनी जीवाची बाजी लावून प्रवाशांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. बस पलटी झाल्यानंतर प्रवाशांनी बाहेर पडण्यासाठी धावपळ केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *