Headlines

पानगव्हाण येथील शेतकरी कन्या वैष्णवीची मुंबई पोलिस दलात निवड:पानगव्हाण येथील गा वकऱ्यांनी घोड्यावर बसवून काढली मिरवणूक‎




जिद्द, चिकाटीच्या जोरावर पानगव्हाण येथील शेतकरी कन्येने मुंबई पोलिस दलात स्थान मिळवले. या यशानंतर ग्रामस्थांनी तिची घोड्यावर बसवून भव्य मिरवणूक काढली. वैजापूर तालुक्यातील पानगव्हाण येथील शेतकरी विनायक तुळशीराम घायवट यांना पाच मुली व एक मुलगा आहे. त्यांची तिसऱ्या क्रमांकाची कन्या वैष्णवी ही आई संगीता यांच्यासोबत घरकाम करत असे. शेतीच्या कामातही ती नेहमी मदत करत असे. वैष्णवीने पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पानगव्हाण येथे पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण खंडाळ्यातील विद्यासागर कन्या प्रशालेत घेतले. पुढे तिने डी फार्मसी, बीएससी संगणक पदवी पूर्ण केली. याच काळात पोलिस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून सराव सुरू ठेवला व यश मिळवले. या यशाबद्दल ग्रामस्थांनी गुरुवारी तिची घोड्यावर बसवून मिरवणूक काढली. त्याआधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी माजी सरपंच सुशीला घायवट, सरपंच मंदाबाई घायवट, माजी सरपंच अनिता घायवट, उपसरपंच चंद्रकांत घायवट, घनश्याम घायवट, गोरख घायवट, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आई- वडिलांनी मुलांप्रमाणेच शिकवले Ãआई-वडिलांचे कष्ट, लहानपणापासून उराशी बांधलेले स्वप्न यामुळे हे यश मिळाले. ग्रामीण भागात राहून कोणत्याही शिकवणी वर्गाशिवाय स्वयंअध्ययन केले. मैदानावर नियमित सराव केला. आई-वडिलांनी पाच मुली असूनही मुलांप्रमाणेच मुलींना उच्च शिक्षण दिले. चांगले संस्कार दिले. त्यामुळेच हे यश गाठता आले. -वैष्णवी घायवट



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *