Headlines

पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे:पानगाव येथील केंद्रात डाॅक्टर गायब, रूग्णांच्या जीवाशी खेळ 24 तासात दोन घटनासमोर‎




काल कुलूप बंद तर दुसऱ्या दिवशी रूग्णांनाकडून लूट तसेच रूग्णांच्या जीवाशी खेळ २४ तासात दोन घटनासमोर ग्रामीण भागातील गरीब आणि सर्वसामान्य जनतेला वेळेवर आणि हक्काची वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. मात्र, बार्शी तालुक्यातील पानगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांचे प्राण वाचण्याऐवजी त्यांच्या जीवाशी खेळण्याचे केंद्र बनले आहे की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एका अपघातात गंभीर जखमी झालेला तरुण रक्ताच्या थारोळ्यात असताना, त्याला तातडीच्या उपचारासाठी पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. मात्र, रुग्णालयाच्या मुख्य जाळीच्या गेटला चक्क कुलूप ठोकलेले. त्यात २४ तासांत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या रूग्णांकडून १ हजार व २ हजार रुपये घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ही माहिती समोर येताच तालुका वैद्यकीय अधिकारी अनिता बांगर यांनी आरोग्य केंद्राला भेट डॉक्टर तसेच सर्व स्टाफला चांगलेच धारेवर धरत सर्व अहवाल तातडीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवणार असल्याचे सांगितले. ^सदर पानगाव येथील आरोग्य केंद्रात डॉक्टर व सिस्टर यांची चौकशी केली व आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी यांना रितसर नोटिस दिल्या तसेच संपूर्ण अहवाल तयार करून लवकरात लवकर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवणार आहे. – डॉ. अनिता बांगर, तालुका वैद्यकीय अधिकारी ^सलग दोन दिवस पानगाव येथील आरोग्य केंद्रात घडलेला प्रकार निंदनीय असून,या प्रकरणात दोषी सर्व अधिकार व कर्मचारी, आरोग्य सेविका यांच्यावर कडक कारवाई न केल्यास आरोग्य केंद्रासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. – पिंटू नाईकवाडी, समाजसेवक कडक कारवाईसाठी लवकरात लवकर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवणार कारवाई न झाल्यास केंद्रासमोर आंदोलन



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *