Headlines

पार्थ, कायनात यांचा विवाह पुढील वर्षी 27 फेब्रुवारीला:धार्मिक प्रथांबाबत शंकराचार्यांकडून मार्गदर्शन




खासदार पार्थ अजित पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे होणार असून त्यांचा साखरपुडा २९ जुलै २०२६ रोजी मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी दिली. पार्थ पवार यांच्या नियोजित वधूचे अधिकृत नाव कायनात दारा असून त्या मूळच्या चंदीगड येथील आणि सध्या दिल्लीमध्ये वास्तव्यास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर धार्मिक प्रथा आणि धर्मशास्त्रातील तरतुदी जाणून घेण्यासाठी करवीर पीठाच्या शंकराचार्यांची भेट घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. पार्थ पवार यांच्या नियोजित वधूचे नाव, त्याचा उच्चार, स्पेलिंग, जन्मस्थळ तसेच सामाजिक पार्श्वभूमीबाबत चुकीची माहिती प्रसारित झाल्याचे ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *