![]()
सिल्लोड तालुक्यात भाजीपाला उत्पादन घेतले जाते. मात्र, उन्हाळी हंगामात टोमॅटो, मिरची, कोबी, कोथिंबीर व फळभाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सिल्लोड तालुक्यातील विहिरींनी तळ गाठला आहे. उन्हाळ्यामुळे भीषण पाणीटंचाई तीव्र झाली आहे. शेकडो फूट खोल गेलेल्या बोअरवेल आणि विहिरींनी तळ गाठल्याने भाजीपाला पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. ऐन हंगामात लाखो रुपये खर्च करून लागवड केलेल्या मिरचीसह विविध भाजीपाला पिकांना पाण्याअभावी करपण्याची वेळ आली आहे. शेतकरी आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडले आहेत. भाजीपाला उत्पादन घेतले जाते. उन्हाळी हंगामात टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, झेंडू, कोथिंबीर व फळभाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यंदाही शेतकऱ्यांनी कर्ज काढून आणि उसनवारी करून पिकांची लागवड केली. मात्र, एप्रिल-मेपासून तापमानपारा सातत्याने चाळिशीपार गेल्याने जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने घसरली. परिणामी, परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. अनेक बोअरवेलमधून पाणी येणे बंद झाले आहे. काही ठिकाणी बोअरवेलमधून अवघा अर्धा ते एक तासच पाणी मिळत असल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. पिके सुकू लागली विहिरींच्या पाण्यावर शेतकरी मिरची पिकासह विविध पिके घेत असतात. पण यंदा सिल्लोड तालुक्यात भूजल पातळी कमी झाली आहे. परिणामी, विहिरींच्या पाण्याचा स्रोत कमी झाला आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. खासगी टँकरचा आधार काही शेतकऱ्यांनी उभी पिके वाचवण्यासाठी खासगी टँकरचा आधार घेतला आहे. तरी हजारो रुपयांचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. बियाणे, खते, औषध फवारणी आणि मजुरी खर्चामुळे बजेट कोलमडत आहे.
Source link
पिंपळदरी परिसरात विहिरींनी गाठला तळ:हंगामी मिरचीचे पीक संकटात, उन्हाळ्यामुळे भीषण पाणीटंचाई, पिके जगवण्यासाठी धडपड