Headlines

गोवंश कत्तलीच्या तयारीत असलेला आरोपी ताब्यात:पैठण शहरातील शहा मोहल्ला परिसरात कारवाई‎




पैठण शहरातील शहा मोहल्ला परिसरात बेकायदेशीररीत्या गोवंश कत्तलीची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई गुरुवारी (दि. २८) दुपारी करण्यात आली. याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ व ९ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा मशीदजवळील जुन्या पडलेल्या वाड्यात शेख इरफान मुन्शी (वय ४२, रा. धनगरवाडा, पैठण) हा कोणताही परवाना नसताना गोवंश कत्तलीची तयारी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी घटनास्थळी आढळून आला. कारवाईदरम्यान सुमारे ३५ हजार रुपये किमतीची गोवंश मादी गाय, गोवंश कापण्यासाठी वापरण्यात येणारे सुरे, संतूर तसेच लाकडी कुंदा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच संबंधित गोवंशाला चारा-पाण्याविना आखूड दोरीने बांधून ठेवल्याचेही निदर्शनास आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *