![]()
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व उर्दू शाळेने यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपली शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १३ आणि उर्दू शाळेतील १० असे एकूण २३ विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले असून, या यशामुळे शाळा, पालक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नम्रता योगेश गव्हांडे, सिद्धी अमोल गव्हाणे, महेक मनवर तडवी, राजेश्वरी सुनील लोखंडे, लावण्या गोकुळ फरकाडे, संस्कृती योगेश सुलताने, दुर्गा अंबादास दौड, सुलक्षणी शिवाजी काळे, जयेश मनोज राठोड, निशांत देवानंद तेली, मंगेश विठ्ठल काकडे, विघ्नेश शांताराम सुसर आणि कुणाल नामदेव काकडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन या यशामागे महत्त्वपूर्ण ठरले. मुख्याध्यापक अनिल परसे यांच्या नेतृत्वाखाली काजीमोद्दीन शेख, सुधाकर तिडके, देवानंद तेली, सुभाष जाधव, अमोल झगरे, नसीर शेख आणि राजिक कुरेशी या शिक्षकवृंदाने नियमित अध्यापनासोबतच विशेष सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन आणि शंकानिरसनावर विशेष भर दिला होता. मुख्याध्यापक अनिल परसे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे कौतुक करत भविष्यातही असाच यशस्वी आलेख कायम ठेवण्याचे आवाहन केले. या दैदिप्यमान कामगिरीबद्दल ग्रामस्थांनीही शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. पिंपळदरी जिल्हा परिषद शाळा ही ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून समोर आली आहे.
Source link
पिंपळदरी शाळेमधील 23 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत यश:गुणवंतांचा सत्कार