![]()
भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवून पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ६५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना १८ जुलै रोजी दुपारी दीड ते तीन वाजेच्या सुमारास दौंड-नगर रोडवरील हिंदुस्थान कारखान्यासमोर घडली. मारुती गोविंद शिंदे (वय ६५) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे भाऊ प्रभाकर गोविंद शिंदे (वय ६०, रा. अरणगाव, शिंदेवाडी, ता. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, मारुती शिंदे हे त्यांच्या दुचाकीवरून किराणा सामान आणण्यासाठी अहिल्यानगरला जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या पिकअप (एमएच १६ सीसी ५१४९) चालक दत्तात्रय दादासाहेब कासार (रा. वाळकी, ता. जि. अहिल्यानगर) याने त्याचे वाहन भरधाव वेगात चालवून शिंदे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने मारुती शिंदे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गतिरोधक नसल्याने अपघात शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत शहराजवळ लोकवस्ती वाढत आहे. या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना नाहीत. दौंड रस्त्यावर मोठी रहदारी व लोकवस्ती असल्याने व या भागात महामार्गावर वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी गतिरोधक व रम्बलर नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
Source link
पिकअपच्या धडकेमध्ये दुचाकीस्वार ठार:6 महिन्यात 525 अपघाती मृत्यू