Headlines

पीएम 12 वर्षांच्या वनवासानंतर नेदरलँडमध्ये जाऊन सांगतात 'बुरे दिन' येणार:इराणशी संबंध ताणले, पेट्रोल 20 रुपयांनी महागणार, जितेंद्र आव्हाडांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरून आणि देशाच्या सद्यस्थितीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये दोन वेगवेगळे सूर पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर आणि वाढत्या महागाईवर घणाघाती टीका केली आहे. 2014 मध्ये ‘अच्छे दिन’चे आश्वासन देणारे पंतप्रधान आता नेदरलँडमध्ये जाऊन ‘बुरे दिन’ येणार असल्याचे सांगत आहेत, असा टोला आव्हाडांनी लगावला; तसेच इराणसोबतचे ताणलेले संबंध आणि आगामी पेट्रोल दरवाढीवरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. दुसरीकडे, शरद पवारांच्या वक्तव्याचा हवाला देत शशिकांत शिंदे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. पंतप्रधानांचे परदेश दौरे हे राष्ट्राचे हितसंबंध जपण्यासाठी आणि देशाच्या फायद्यासाठीच असतात,असे सांगत त्यांनी पवारांच्या विधानाचा वेगळा अर्थ न काढण्याचे आवाहन केले. तसेच, शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राजकीय मतभेद असल्याचे म्हटल्याचीही त्यांनी आठवण करुण दिली. तर यामुळे ‘इंडिया’ आघाडीत कोणतीही फूट पडलेली नाही, उलट शरद पवार आघाडी मजबूत करण्याचेच काम करत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. पेट्रोल 20 रुपयांनी महागणार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि त्यांनी देशाला सांगितले की अच्छे दिन येणार आहेत. 12 वर्षांच्या वनवासानंतर (दुसऱ्या देशात) नेदरलँडमध्ये जाऊन म्हणाले की बुरे दिन येणार आहेत तयार रहा. वाईट दिवस येणार आहेत तर ते भारतात सांगा ना दुसऱ्या देशात का सांगत आहात? बुरे दिन कोणावर येणार आहेत? पेट्रोल पुढच्या काही दिवसांमध्ये 20 रुपयांनी महागणार आहे. गरीब माणसांचे जगणं अवघड होणार आहे, तो या त्रासाने मरणार आहे. आजच ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल काहीही मिळत नाही. पाण्याचे पंप त्यावर चालतात. लोकांना तुम्ही जगवणार कसे, देश असा चालत नाही. बंगाल निवडणुकीपूर्वी काही समजले नाही का? जितेंद्र आव्हाड म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांनी कुठल्या उद्देशाने परदेश दौरे केले हे त्यांनाच माहिती. प्रश्न असा आहे की बंगाल निवडणुकीच्या पूर्वी का नाही सांगितले की देशाची परिस्थिती इतकी वाईट आहे ते. शरद पवारांनी जर सांगितले की देशाची परिस्थिती वाईट आहे तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे तर यामध्ये गैर काय? बंगालच्या निवडणुकीनंतर तुम्हाला सर्व काही समजते का? पडळकरांच्या बुद्धीचे कौतुक करावे जितेंद्र आव्हाड म्हणाले की,आपल्या देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध इतके ताणले गेले आहेत का की आपल्याला पेट्रोल मिळूच शकत नाही. इराण असा देश होता ज्याने आपल्याला रुपयामध्ये व्यवहार करण्याची संधी दिली होतीआणि आज तोच इराण आपल्या विरोधात वागतो आहे. जहाज येऊ देत नाही. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यांची कोणीही खिल्ली उडवू नये. त्यांना खूप ज्ञान आहे. त्यांच्या बुद्धीचे कौतुक करायला हवे.शरद पवार हे राहुल गांधी यांच्यासोबत आहेत. राहुल गांधी कुठेही एकटे पडत नाहीत. इंडिया आघाडीत फुट नाही- शिंदे शशिकांत शिंदे म्हणाले की, शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वक्तव्य केले म्हणजे काही इंडिया आघाडीत फुट पडली असे होत नाही. देशहितासाठी काही वेळा गोष्टी कराव्या लागतात. यावेळी बोलताना पवारांनी हे सुद्धा सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे राजकीय मतभेद आहेत. इंडिया आघाडी मजबूत करण्याचे कामच शरद पवार यांनी केले आहे. सत्ताधाऱ्यांनी कसे वागायचे हे ठरवावे- शिंदे शशिकांत शिंदे म्हणाले की, पंतप्रधानांचे परदेश दौरे हे राष्ट्राचे हितसंबंध जपण्यासाठी होत असतात, असे शरद पवारांनी सांगितले आहे. त्याचा देशाला फायदा होतो. शरद पवार यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे आवाहन केल्यानंतर त्यांना काटकसरीबद्दल शरद पवारांनी सांगण्याची गरज नाही.सरकारमधील लोकांनी कसे वागावे ही त्यांनी ठरवले पाहिजे, तर पंतप्रधान यांनी ठरवावे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *