Headlines

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पॉवर गोल्ड जिमला आग:अग्निशमन दलाकडून 20 मिनिटांत आगीवर नियंत्रण




पुणे शहरातील कल्याणीनगर येथील पॉवर गोल्ड जिममध्ये सोमवारी पहाटे आग लागली. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत सुमारे २० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र जिममधील वातानुकूलन यंत्रणा, विद्युत वायरिंग, पीओपी आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला पहाटे ५.५१ वाजता आगीची माहिती मिळाली. त्यानंतर येरवडा आणि नायडू अग्निशमन केंद्रांची वाहने तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आली. तीन मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या जिममध्ये आग लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत श्वसन उपकरणांचा (बीए सेट) वापर करून जिममध्ये कोणी अडकले नाही याची खात्री केली. धूर बाहेर काढण्यासाठी काचा फोडण्यात आल्या. धुराचे प्रमाण अधिक असल्याने एक्सॉस्ट ब्लोअरचाही वापर करण्यात आला. अथक प्रयत्नांनंतर सुमारे २० मिनिटांत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि त्याचा शोध सुरू आहे. या बचावकार्यात चालक धीरज सोनवणे, चेतन ढुमे, अनुप साबळे, ओंकार ताठे यांच्यासह जवान विष्णू जाधव, भूषण सोनवणे, शंतनू कोकणे, ऋषिकेश पवार, छगन मोरे, श्रीराम कराड, प्रणव कांबळे, रऊफ शेख, हिरामण मोरे, जयेश गाताडे आणि भालचंद्र गव्हाणकर यांनी सहभाग घेतला. लिफ्टमध्ये अडकलेल्या पाच जणांची सुखरूप सुटका कात्रजमधील ऋतुगंधा सोसायटीत लिफ्टमध्ये चार प्रौढ आणि अडीच वर्षांचे एक बालक अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी हायड्रॉलिक स्प्रेडर व कटावणीच्या साहाय्याने लिफ्ट उघडून सर्वांची सुखरूप सुटका केली. ही कारवाई अग्निशामक दलाकडून करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *