Headlines

पुण्यात पुन्हा वैष्णवी:10 तोळे सोन्यासह लग्नात 45 लाख खर्च, तरीही कारसाठी जाच; विवाहितेची आत्महत्या, पतीसह सासू-सासऱ्यांकडून मानसिक व शारीरिक छळ



चारचाकीसाठी माहेरहून ५ लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा पती, सासू आणि सासऱ्यांकडून मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून उंड्री-वडाचीवाडी परिसरातील २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फि

.

वैष्णवी प्रवीण जरांडे असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह ९ मे २०२६ रोजी ओंकार संजय घिसरे याच्याशी झाला होता. विवाहाच्या वेळी मुलीला दहा तोळे सोने देण्यात आले. तसेच लग्नाचा ४५ लाखांचा संपूर्ण खर्च माहेरच्यांनी केला. पतीच्या मागणीनुसार नातेवाइकांनी त्याला दुचाकीही दिली. लग्नानंतर वैष्णवी सासरी २३ दिवस राहिली. त्यानंतर नोकरीनिमित्त बेंगळुरू येथे गेली. जूनअखेरीस ती पुन्हा सासरी आली आणि घरातूनच आयटी कंपनीचे काम करू लागली. सासू घरकामावरून टोमणे मारायची. तसेच पती आणि सासरेही अपमानास्पद बोलत असल्याचे तिने माहेरी सांगितले होते.

पती त्रास देत असल्याचे नमूद

१० जून रोजी पती ओंकारने वैष्णवीच्या वडिलांना फोन करून चारचाकी घेण्यासाठी पाच लाख रुपये द्यावेत किंवा गाडी घेऊन द्यावी, अशी मागणी केल्याचा आरोप आहे. लग्नासाठी ४० ते ४५ लाख रुपये खर्च झाला असून आता पैसे देण्याची परिस्थिती नसल्याचे वडिलांनी सांगितले. त्यानंतर माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी पतीकडून त्रास दिला जात असल्याचे वैष्णवीने आईला सांगितले. वैष्णवी गर्भवती असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

१९ सप्टेंबरपासून हिंजवडीमधील आयटीत कंपनी होती कार्यरत

१९ सप्टेंबरपासून तिला हिंजवडीच्या आयटी कंपनीतून काम करावे लागत होते. सकाळी पावणेआठला घरातून निघून रात्री आठच्या सुमारास ती घरी यायची. त्यानंतरही घरातील कामे करावी लागत असल्याचे ती माहेरी सांगत होती.२४ सप्टेंबर रोजी रात्री वैष्णवीने आईला फोन करून सासरी खूप त्रास होत असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास पती ओंकारने तिच्या आईला फोन करून, “तुमच्या मुलीला घरी घेऊन जा, नाही तर माझ्याकडून काहीतरी बरेवाईट होईल,” असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

वैष्णवीचा मृतदेह गोधडीत

कुटुंबीयांनी वैष्णवीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. २५ सप्टेंबरच्या पहाटे नातेवाइकांकडून वैष्णवीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिचे आई-वडील उंड्री येथील घरी पोहोचले. त्या वेळी वैष्णवीचा मृतदेह गोधडीने झाकलेल्या अवस्थेत आढळला. तिने पंख्याला गळफास घेतल्याचे सासरच्या मंडळींनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पुन्हा एका वैष्णवीने जीवन संपवले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *