![]()
पती आणि दोन मुलांच्या मृत्यूच्या घटनेनंतर मानसिक धक्का बसलेल्या शिक्षिकेने राहत्या घरी २६सप्टेंबरला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या शिक्षिकेवर नांदेडमध्ये उपचार सुरु होते. सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना नांदेड शहरातील सांगवी भागातील गोपाळनगर येथे घडली.ध म्मशिला मोरे असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. भोकर तालुक्यातील बेंबर येथील मूळ रहिवासी असलेले सुनील मोरे हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. त्यांच्या पत्नी धम्मशिला मोरे या देखील शिक्षिका होत्या. सुनील मोरे यांनी १७ जुलैला मुलगी सारा आणि मुल गासुमित यांच्यासह कार गोदावरी नदीपात्रात घालून आत्महत्या केली होती. या प्रकरणाच्या तपासात त्यांनी दोन्ही मुलांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. पती आणि दोन्ही मुलांच्या मृत्यूनंतर शिक्षिका धम्मशीला मोरे यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. या धक्क्यातून त्या सावरल्या नव्हत्या. २६ सप्टेंबरला दुपारी एकच्या सुमारास त्यांनी गोपाळनगर येथील राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र,उपचारादरम्यान २८ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. पती आणि दोन मुलांच्या मृत्यूनंतर धम्मशीला यांचाही मृत्यू झाला. 3 महिन्यांत कुटुंबच संपले १७ जुलैला धम्मशीला मोरे यांच्या पतीने दोन्ही मुलांसह कार गोदावरी नदीच्या पुलावरून थेट नदीपात्रात घालून आत्महत्या केली होती.त्यानंतर कुटुंबात एकट्यात उरलेल्या धम्मशीला मोरे यांनी देखील जीवन संपवले. त्यामुळे तीन महिन्यांच्या काळात संपूर्ण कुटुंबच संपले आहे.
Source link
पती, दोन मुलांच्या मृत्यूनंतर शिक्षिकेने केली आत्महत्या:नांदेडला दोन दिवसांपूर्वी गळफास घेण्याचा प्रयत्न