Headlines

तळाशी पाझर फुटल्याने लोणार सरोवराचे पाणी वाढतेय:सरोवरात गोडे पाणी सातत्याने का वाढतेय याचे गूढ आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी उकलले




जगप्रसिद्ध लोणार सरोवराची जलपातळी अचानक का वाढतेय, या मागील भूगर्भीय रहस्याचे गूढ उकलले आहे. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने सरोवराच्या तळाशी व पायथ्याशी गोड्या पाण्याचे नवीन झरे प्रवाहित झाले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून हा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. विभागीय आयुक्त तथा लोणार संवर्धन समितीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अंतिम अहवालानंतर उच्च न्यायालय नियुक्त समिती, महाराष्ट्र शासन, वन्यजीव विभाग व पुरातत्त्व सर्वेक्षणाला सरोवराची जलपातळी नियंत्रित करण्यासाठी अंतिम ‘ॲक्शन प्लॅन’ निश्चित करता येणार असल्याचे गुंडे यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना सांगितले. फ्रॅक्चर सिमेंटिंगने झरे बंद करून सरोवरात गोडे पाणी रोखणे शक्य लोणार सरोवरातील वाढती पाण्याची पातळी थांबवणे शक्य आहे. त्यासाठी या परिसरात भूशास्त्रीय सर्वेक्षण करावे लागेल. जमिनीतील पाण्याचे ॲक्विफर लॉकेट करून त्याद्वारे वाहणारे झरे फ्रॅक्चर सिमेंटिंगद्वारे बंद करून तलावात येणारे पाणी थांबवता येईल. तातडीचा उपाय म्हणून जमिनीवरून तलावात जाणारे पाणी योग्य ठिकाणी थांबवणे व तेथून ते लिफ्ट करणे. त्यासाठी तातडीने निर्णय घेतले पाहिजे तरच पाणीपातळी कमी होईल व पाण्यात बुडालेली मंदिरे बाहेर येतील. डॉ.अशोक तेजनकर, भूजलतज्ज्ञ नयना गुंडे, विभागीय आयुक्त, अमरावती लोणारची जलपातळी का वाढतेय?
गतवर्षीच्या अतिवृष्टीने भूजलपातळी वाढल्याने लोणार सरोवराच्या तळाशी व पायथ्याशी नव्याने गोड्या पाण्याचे झरे प्रवाहित झालेले आहेत. शेजारच्या तलावातूनही पाणी पाझरतेय. हवामान बदलाचा, पर्जन्यमान बदलाचा हा सर्वात मोठा परिणाम आहे. गोड्या पाण्याने पातळी किती वाढली?
सरोवरातील पाण्याच्या बाष्पीभवनापेक्षा आवक जास्त आहे व सरोवरातून पाणी बाहेर जाण्यासाठी कोणताही नैसर्गिक मार्ग नाही. 2022 पासून 4 मीटरने जलपातळी वाढली. सरोवराच्या काठावर काय परिणाम झालाय?
सरोवराचा परीघ (व्यास) मोठ्या प्रमाणात विस्तारला असून काठावर असलेली मंदिरे व झाडे पाण्याखाली गेली आहेत. बुडालेली मंदिरे कशी बाहेर काढणार?
सरोवरामध्ये जाणाऱ्या गोड्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित केल्यास सरोवराची पातळी कमी होऊ शकेल व पाण्याखाली गेलेली मंदिरे पुनरुज्जीवित किंवा दृश्यमान होतील. कोणत्याही यांत्रिक उपकरणाने मंदिरांना धक्का न लावता केवळ सरोवराची पातळी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात येतील गोड्या पाण्याने पीएच घसरला आहे का?
होय, सरोवराचा पीएच घसरला आहे. सध्याचा पीएच 9.5 ते 10 च्या आसपास आहे. जलपातळी कमी करण्यासाठी उपाय काय?
अकोला वन्यजीव विभागाने सरोवरामध्ये विविध स्रोतांतून येणारे गोडे पाणी वळते करून अभयारण्य क्षेत्राबाहेर नगर परिषदेच्या जल शुद्धीकरण प्रकल्पात वळवण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर केलेला आहे. परवानगी प्राप्त होताच काम सुरू करू.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *