Headlines

स्व. अरुणकाका नगर शहराला लाभलेले सर्वसमावेशक लोकाभिमुख नेतृत्व- शिंदे:विधानपरिषदेचे सभापती‎ प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन‎




माजी नगराध्यक्ष माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप हे नगर शहराला लाभलेले एक अत्यंत सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख नेतृत्व होते, असे गौरवोद्गार विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी काढले. मराठा सेवा संघ प्रणित अहिल्यानगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यात पतसंस्थेच्यावतीने स्व. अरुणकाका जगताप यांच्या सामाजिक, राजकीय योगदानाबद्दल त्यांना मरणोपरांत पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र सचिन जगताप, कुटुंबीय व सहकाऱ्यांनी स्वीकारला. यावेळी प्राचार्य रघुनाथ आगळे, निवृत्त उपअभियंता बबनराव खिलारी, उद्योजक सुरेश चव्हाण, शिवमती सुजाताताई ठुबे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पारनेरचे डॉ. रफिक सय्यद यांना कर्मतपस्वी पुरस्कार देण्यात आला. मराठा युवा उद्योजक पुरस्कार शिवश्री राजेंद्र ससे, सुधीर व शिवमती माधुरी नवले, किरण बेरड यांना प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास इतिहास संशोधक व शिवव्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, महापौर ज्योती गाडे, दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रवीण दहातोंडे, बाळकृष्ण काळे, चेअरमन उदय अनभुले, किशोर मरकड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण दहातोंडे यांनी केले तर संस्थेच्या वाटचालीचा आढावा बाळकृष्ण काळे यांनी मांडला. पुरस्कारार्थींचा परिचय आणि भूमिका किशोर मरकड यांनी मांडली. उदय अनभुले यांनी आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *