![]()
या वर्षी पावसाळ्यात अपेक्षित पाऊसच न पडल्यामुळे दुधना नदीला एकही पूर नाही व परिसरातील सर्वच पाठ बंधारे कोरडे आणि लाडसावंगी परिसराला दिलासा देणारे कऱ्हाडी धरण पूर्णपणे कोरडेठाक पडले आहे. धरणात एका टक्क्यानेही पाणीसाठा वाढलेला नसल्याने लाडसावंगीसह परिसरातील चार गावांवर पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट ओढवल्याचे चित्र आहे. आहे. जलजीवन मिशनचे सोमठाणा येथून येणारे पाणी अजूनही पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणा नागरिकांना मिळाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या लाडसावंगी येथे आजघडीला पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. या परिस्थितीत गावकरी पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार सुहास शिरसाट यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत थेट जिल्हाधिकाऱ्यांना या कामाबाबत जाब विचारला. जलजीवन मिशनचे काम संथ गतीने का सुरू आहे, असा सवाल करत त्यांनी उर्वरित तीस टक्के काम त्वरित पूर्ण करून लाडसावंगी व परिसरातील गावांचा पाणीप्रश्न तत्काळ निकाली काढण्याची ठाम मागणी केली आहे. शासनाने आणि संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योजनेचे काम वेळेत पूर्ण न केल्यास लाडसावंगी गावकऱ्यांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागणार आहे. आगामी काळात पाऊस न आल्यास ही परिस्थिती अधिकच बिकट आणि हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केवळ तीस टक्के काम बाकी; उपाययोजना करा गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या ‘जलजीवन मिशन’ योजनेचे काम सत्तर टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. केवळ तीस टक्के काम बाकी असून, हे शिल्लक राहिलेले काम प्रशासनाने तातडीने पूर्ण करावे, अशी आक्रमक मागणी लाडसावंगी येथील नागरिकांनी केली आहे.
Source link
संकटात भर:कऱ्हाडी धरण कोरडेठाक, लाडसावंगीसह परिसरातील पाणीप्रश्न गंभीर; ग्रामस्थांचा पदाधिकाऱ्यांविरुध्द रोष