![]()
पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान तुफान राडा झाला असून, यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडे यांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रेखा कोंडे या शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षा तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा आहेत. कार्यक्रमादरम्यान अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहर अध्यक्षा आरती मारणे-पवार यांनी आपल्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप रेखा कोंडे यांनी केला आहे. आरती मारणे यांनी सांगितले की, रेखा कोंडे हिने आक्षेपार्ह व्हिडिओ तसेच माझी बदनामी केल्यामुळे आमचा राग अनावर झाला. आम्ही काही रस्त्यावरती पडलो नाहीत, माझे चार लग्न झाले आहेत असं ती म्हणते. जरांगे पाटील यांच्यावरही बोलत असते. सुषमा अंधारे यांना माझी विनंती आहे की रेखा कोंडेला पक्षातून काढून टाका, तसेच मराठा महासंघातूनही काढून टाका. तसेच आमच्याबद्दल ती घाण घाण बोलत आहे. माझ्या दोन मुली आहेत त्यांना काय वाटेल? मी कधी रेखा कोंडेंविषयी काहीही वाईट बोलले नाही. मी मराठ्यांची वाघीण आहे म्हणून आरोपाला उत्तर दिले, मी अन्याय सहन करणारी नाही. रेखा कोंडे सतत पक्ष बदलत असतात. तिला कोणी घेत नाही तरी तीची गाडीत बसायची तयारी असते, अशी टीका मारणे यांनी केली आहे. रेखा कोंडे काय म्हणाल्या? तर मराठा महासंघाची आरती माने नावाची नावाची महिला माझ्यावर जळते, तिने मला मारहाण केली. मी तिची कुठलीही बदनामी केली आहे. माझे पती नसताना या महिलेने माझ्यावर खोटे आरोप केले. मी सामाजिक क्षेत्रात एकटी काम करते, महिलांसाठी लढते. तिला माझे काम बघवत नाही, असा आरोप रेखा कोंडे यांनी केला आहे.
Source link
पुण्यात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात तुफान राडा:शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडे यांना मारहाण, नेमके काय घडले?