![]()
पुणे शहरातील घोरपडे पेठेत प्रेमप्रकरणातून एका 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश अशोक हलवाई (वय 24, रा. घोरपडे पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. स्वप्नाली संतोष तावरे (वय 32, रा. महाड, जि. रायगड) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोमल नीलेश सोनवणे (वय 30, रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गणेश आणि आरोपी स्वप्नाली तावरे यांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणाची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर नातेवाईकांच्या बैठकीत दोघांनी एकमेकांशी बोलू नये किंवा भविष्यात कोणतेही संबंध ठेवू नयेत, असे ठरले होते. मात्र, या बैठकीनंतरही आरोपी महिलेने गणेशला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून गणेशने घोरपडे पेठेतील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेशच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून त्याच्या बहिणीने फिर्याद दिली. त्यानुसार स्वप्नाली तावरे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक एस ताळीकोटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला गुलटेकडी परिसरात चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून डोक्यात लोखंडी वस्तू मारून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यश किशोर यादव (वय 24, रा. बुद्ध विहाराच्या समोर, गुलटेकडी, पुणे) याच्यावर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किरण उत्तरेश्वर लांडगे (वय 26, रा. गुलटेकडी, स्वारगेट, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांचे मित्र चहा पिण्यासाठी गुलटेकडी येथील अन्नपूर्णा टी सेंटर समोर थांबले होते. यावेळी आरोपीने जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारली आणि हाताने बेदम मारहाण करून त्यांना जखमी केले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एल शिरसाठ करत आहेत.
Source link
पुण्यात प्रेमप्रकरणातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या:आत्महत्येस प्रवृत्त केल्याने महिलेविरुद्ध गुन्हा दाखल