![]()
नाशिकमधील भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यातून अंधश्रद्धेचा आणि विकृतीचा एक अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करून, स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणवणाऱ्या स्वप्नील लांडे या भोंदूबाबाने एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्याच्यावर ‘पोक्सो’ (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा स्वयंघोषित गुरुवर्य सध्या फरार आहे. या घटनेने संपूर्ण पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय? पुण्यातील बिबवेवाडी परिसरात राहणारा आरोपी स्वप्नील लांडे हा अंधश्रद्धा, भीती आणि चमत्कारांच्या नावाखाली लोकांचा विश्वास संपादन करत असे. याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने हे संतापजनक कृत्य केले आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या नराधमाने एका अल्पवयीन मुलीला स्वतःच्या मांडीवर बसवून तिच्या कानात मंत्र फुंकल्याचा बनाव केला. “तुला कसलीही अडचण किंवा संकट आले तर थेट माझ्याकडे ये,” असे खोटे आमिष दाखवत त्याने या निरागस चिमुकलीच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन तिचे लैंगिक शोषण केले. पीडितेचे समुपदेशन, आरोपीचा शोध सुरू या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मुलीला मोठा मानसिक धक्का बसला असून, सध्या तज्ज्ञांकडून तिचे समुपदेशन केले जात आहे. बिबवेवाडी परिसरातील एका व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी स्वप्नील लांडे फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. या फरार भोंदूबाबाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. आणखी किती जणांचे शोषण? दैवी शक्तीच्या नावाखाली लोकांच्या भावनांशी खेळणाऱ्या या भोंदूबाबाने केवळ एकाच मुलीचे शोषण केले आहे की त्याचे आणखी कोणी बळी आहेत? याचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत. त्याने आतापर्यंत किती कुटुंबांची आर्थिक किंवा मानसिक फसवणूक केली आहे, याचीही सखोल चौकशी केली जात आहे. पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या या किळसवाण्या भोंदूगिरीमुळे समाजातील अंधश्रद्धेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चमत्कार आणि दैवी शक्तीच्या भूलथापांना बळी पडून निरागस बालकांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी पालकांनी अधिक सतर्क राहण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अशा भोंदू प्रवृत्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी संतप्त मागणी आता नागरिक करत आहेत. हेही वाचा… ‘केमिकल’द्वारे बनावट नोटा बनवणारी टोळी गजाआड: रसायनांद्वारे खऱ्या नोटेची प्रतिकृती छापण्याची होती ‘मोड्स ऑपरेंडी’ त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळेगाव शिवारात केमिकल लिक्विड आणि विशेष कागदाच्या साहाय्याने ५०० रुपये दराच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता तळेगाव येथील ‘शिवकृपा’ बंगल्यात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल १२ लाख १९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
पुण्यात भोंदूबाबाचं किळसवाणं कृत्य:मांडीवर बसवून कानात मंत्र फुंकला; स्वयंघोषित 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण