Headlines

Fadnavis Slams Sharad Pawar Over Chakan Industry & Company Closure Claims


पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतून 20 कंपन्यांचे स्थलांतर आणि राज्यात गेल्या 5 वर्षांत 36 हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याच म

.

प्रकरण नेमकं काय आहे?

नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार राजाभाऊ वाजे यांनी विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्र्यांनी उत्तर दिले होते. त्यानुसार, गेल्या 5 वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल 36,211 खासगी कंपन्या बंद पडल्याची माहिती समोर आली. याच आकडेवारीचा आणि चाकण एमआयडीसीतून मूलभूत सुविधांच्या अभावामुळे 20 कंपन्या स्थलांतरित होत असल्याचा संदर्भ देत, शरद पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते. ‘हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र असून उद्योगांचे असे स्थलांतर होणे राज्याला भूषणावह नाही,’ अशी टीका पवारांनी केली होती.

मुख्यमंत्री फडणवीसांचे शरद पवारांना आकडेवारीसह प्रत्युत्तर

शरद पवारांच्या या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीची सविस्तर फोड करून सांगितली आहे. ‘तुम्ही महाराष्ट्रहिताचा विचार करणारे सुजाण आणि ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळे तुमच्या मनात कोणताही गैरसमज राहू नये म्हणून हा लेखनप्रपंच करत आहे,’ असे म्हणत फडणवीसांनी पुढील मुद्दे मांडले:

76 टक्के कंपन्या कधी सुरूच झाल्या नाहीत

फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ज्या कंपन्या बंद झाल्याची आकडेवारी दिली जात आहे, त्यापैकी 76 टक्के कंपन्या या ‘डिफंक्ट’ आहेत, म्हणजेच त्या केवळ कागदावर होत्या, प्रत्यक्षात त्या कधी सुरूच झाल्या नव्हत्या! तसेच, 12 टक्के कंपन्यांचे एकत्रीकरण झाले आहे आणि केवळ 2 टक्के कंपन्या विसर्जित झाल्या आहेत. 2019-20 मध्ये केंद्र सरकारने विशेष मोहीम राबवून 6 लाख ‘निष्क्रिय’ कंपन्यांची नोंदणी रद्द केली होती.

मोदींच्या काळात सक्रिय कंपन्या तिप्पट वाढल्या

“2015-16 मध्ये भारतात सक्रिय कंपन्यांची संख्या 6,78,768 इतकी होती, ती आता 21,17,747 इतकी झाली आहे. म्हणजेच गेल्या 10 वर्षांत सक्रिय कंपन्यांच्या संख्येत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे,” असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

सर्वाधिक कंपन्या आजही महाराष्ट्रातच

3 जून 2026च्या आकडेवारीनुसार, देशात सर्वाधिक कंपन्या आजही महाराष्ट्रातच (3,96,211) आहेत. त्याखालोखाल दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. तसेच, नवीन कंपनी नोंदणीतही महाराष्ट्र (41,525 कंपन्या) देशात सर्वांत पुढे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह मांडले.

चाकणमधील समस्यांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू

चाकणमधील उद्योगांच्या स्थलांतराबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी मान्य केले की, “तेथे काही समस्या निश्चितपणे आहेत. मात्र, उद्योगमंत्री उदय सामंत यांना तेथे लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. एमआयडीसी, जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची 12 ऑगस्ट रोजी एकत्रित बैठक झाली असून समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आराखडा निश्चित करण्यात आला आहे. एकही उद्योग तेथून बाहेर जाणार नाही, असाच आमचा प्रयत्न राहील.”

शरद पवारांच्या ट्विटमधील प्रमुख मुद्दे

  • चाकणमधील २० कंपन्या वाहतूक कोंडी, प्रदूषण, वीज आणि रस्त्यांच्या समस्येमुळे स्थलांतर करत असून, २ हजारांहून अधिक कामगारांच्या रोजगारावर संकट आहे.
  • ५ वर्षांत ३६,२११ कंपन्या बंद झाल्या, पण किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना मोबदला मिळाला का, याची माहिती सरकारकडे नाही. हे अत्यंत धक्कादायक आहे.
  • सरकारने तातडीने ‘एक खिडकी’ यंत्रणा उभारून उद्योजकांच्या समस्या सोडवाव्यात आणि ‘औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र’ हा यशवंतराव चव्हाणांचा वारसा राज्यकर्त्यांनी टिकवावा.

फडणवीस विरुद्ध पवार; आकडेवारीच्या अर्थावरून संघर्ष

पवारांनी 36 हजार कंपन्यांच्या बंद होण्याचा मुद्दा उपस्थित करत उद्योग, रोजगार आणि पायाभूत सुविधांवर सरकारला घेरले. त्याला उत्तर देताना फडणवीसांनी कंपन्या ‘बंद’ होण्याच्या आकडेवारीमागचा प्रकार समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.

एकीकडे विरोधक या आकडेवारीतून उद्योगांसमोरील अडचणी आणि रोजगाराचा प्रश्न अधोरेखित करत आहेत, तर दुसरीकडे सरकार ‘स्ट्राइक ऑफ’, डिफंक्ट, विलीनीकरण आणि प्रत्यक्ष व्यवसाय बंद होणे यामध्ये फरक असल्याचे सांगत आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्रातील 36,211 कंपन्यांचा नेमका अर्थ काय, त्यापैकी किती कंपन्या प्रत्यक्ष व्यवसाय करत होत्या आणि किती कंपन्या केवळ नोंदणीकृत मात्र निष्क्रिय होत्या, यावरून पुढील राजकीय वाद आणखी रंगण्याची शक्यता आहे.

फडणवीस यांनी मात्र महाराष्ट्र उद्योगस्नेही असल्याचा पुनरुच्चार करत राज्य परकीय गुंतवणुकीत आणि उद्योगांच्या संख्येत आघाडीवर असल्याचे सांगितले आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र क्रमांक एकवर होता आणि कायम क्रमांक एकवरच राहील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा…

5 वर्षांत 36 हजार कंपन्या बंद:आता चाकणमधून 20 कंपन्यांचे स्थलांतर; उद्योगांच्या दुरवस्थेवरून शरद पवारांचा सरकारवर घणाघात

पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल २० कंपन्यांनी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर चिंता व्यक्त करत जोरदार निशाणा साधला आहे. “पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचे स्थलांतर होणे किंवा ते बंद पडणे हे महाराष्ट्रासाठी निश्चितच भूषणावह नाही,” अशा शब्दांत पवारांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.