Headlines

स्वातंत्र्यदिनी विदर्भातील 25 जणांना राष्ट्रपती पदके जाहीर:सर्वाधिक पदकांत गडचिरोली जिल्हा अव्वल स्थानी




स्वातंत्र्यदिन 2026 च्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने विविध सेवा पदके जाहीर केली. यामध्ये विदर्भातील पोलीस, कारागृह आणि होमगार्ड विभागातील एकूण 25 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नक्षलग्रस्त भागातील अतुलनीय शौर्य, पोलीस दलातील प्रदीर्घ गुणवत्तापूर्ण सेवा तसेच कारागृह आणि होमगार्ड विभागातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हे सन्मान प्रदान करण्यात आले आहेत. या पदकांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानात शौर्य दाखवणाऱ्या 20 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत. यात तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक राजू गवळी आणि वासुदेव मडावी या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत दिलीप आत्राम, अजय मडावी, गणेश दुब्बुला, विजय मडावी, भूपेश जुमनाके, दळसू बोगामी, राजेश किरंगे, मसा आत्राम, विजय कोडपे, दशरथ मडावी, राकेश बेडके, सुधाकर पोर्टेट, श्रीनिवास निष्टुरी, गणेश गंजीवार, नितेश टेंभेकर, शिवाजी हिचामी आणि संजय कांकाबांधवार या पोलीस हवालदार व शिपायांनाही शौर्य पदके प्रदान करण्यात आली आहेत. पोलीस दलातील प्रदीर्घ आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी विदर्भातील पोलीस निरीक्षक वैभवकुमार जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण आत्राम आणि पोलीस हवालदार राजकुमार जनबंधू या तिघांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, कारागृह विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल हवालदार संजय तलवारे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. तसेच, होमगार्ड विभागातील निष्ठावान सेवेसाठी मनोज बारसागडे यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. विदर्भातील या सर्व 25 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून आणि पोलीस प्रशासनाकडून त्यांचे कौतुक होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *