पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील (MIDC) २० कंपन्या राज्याबाहेर स्थलांतरित होणार असल्याच्या मुद्यावरून शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. या टीकेला आता भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले आहे. “चाकणमधून
.
‘शरद पवारांच्या सूचनेवर उद्योगमंत्री नक्कीच काम करतील’
चाकण एमआयडीसीतील कंपन्यांच्या स्थलांतराबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “याप्रकरणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आधीच पुढाकार घेतला आहे. चाकणमधील मुख्य समस्या ही रस्त्यांची होती. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-चाकण रस्त्यासाठी भरघोस निधीची तरतूद केली आहे. तिथे इतर सर्व सोयी-सुविधाही उपलब्ध आहेत.”

शरद पवारांच्या टीकेवर सकारात्मक प्रतिक्रिया देताना बावनकुळे पुढे म्हणाले, “शरद पवार साहेबांनी जी सूचना दिली आहे, त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत निश्चितपणे काम करतील. कुठलीही कंपनी एमआयडीसीमधून किंवा राज्याबाहेर जाणार नाही, याची पूर्ण काळजी राज्य सरकार घेईल.”
‘व्यंग करून कोणीही मोठे होत नाही’
या पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ते म्हणाले, “राहुल गांधी यांना आता काहीही काम उरलेले नाही. ते केवळ व्यंग आणि टीका करण्याचे काम करतात. पण, जे लोक केवळ व्यंग करतात ते राजकारणात फार काळ टिकत नाहीत. केवळ व्यंग आणि खिल्ली उडवून कोणीही मोठा नेता होत नसतो.”
शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय; महिनाभरात पूर्ण करणार काम
राज्यातील शेतकऱ्यांच्या एका महत्त्वाच्या प्रश्नावरही बावनकुळे यांनी या पत्रकार परिषदेत भाष्य केले. ते म्हणाले की, “राज्यामध्ये सध्या असे २ लाख ३१ हजार शेतकरी आहेत, ज्यांच्या नावावर अधिकृत सातबारा (7/12) उतारा नाही. सातबारा नसल्यामुळे या शेतकऱ्यांना पीकविमा योजना किंवा पीक कर्ज यांसारख्या सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. या सर्व शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही आता विशेष पुढाकार घेत आहोत.”
याबाबत माहिती देताना ते म्हणाले, “कालपर्यंत आम्ही जवळपास ६० हजार शेतकऱ्यांचे काम मार्गी लावले आहे. आता १ लाख ६० हजार शेतकरी शिल्लक राहिले असून, येत्या महिनाभरात त्यांचेही काम पूर्ण केले जाईल, असा मला विश्वास आहे.”
हेही वाचा..
5 वर्षांत 36 हजार कंपन्या बंद:आता चाकणमधून 20 कंपन्यांचे स्थलांतर; उद्योगांच्या दुरवस्थेवरून शरद पवारांचा सरकारवर घणाघात

पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल २० कंपन्यांनी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर चिंता व्यक्त करत जोरदार निशाणा साधला आहे. “पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचे स्थलांतर होणे किंवा ते बंद पडणे हे महाराष्ट्रासाठी निश्चितच भूषणावह नाही,” अशा शब्दांत पवारांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. सविस्तर वाचा